- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार: ‘गर्जतो मराठी’ मराठी गीतांचा नजराणा 30 एप्रिल रोजी

महाराष्‍ट्र दिनाच्‍या पूर्वसंध्‍येला दि बिटल्‍स ग्रुपचे आयोजन

नागपूर समाचार : दि बिटल्‍स ग्रुप प्रस्‍तुत ‘गर्जतो मराठी’ हा मराठी गीतांचा कार्यक्रम महाराष्‍ट्र दिनाच्‍या पूर्वसंध्‍येला म्‍हणजे रविवार, 30 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 5.30 वाजता आयोजित करण्‍यात आलेला आहे. सायंटिफिक सोसायटी सभागृह, लक्ष्‍मीनगर येथे होणा-या या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण सुप्रसिद्ध गायक इंडियन आयडॉल फेम अमेय दाते हे राहणार आहेत. 

कार्यक्रमाची संकल्‍पना दि बिटल्‍स ग्रुपचे श्‍याम बापटे, आरती बुटी व मनश्री जोशी यांची असून संगीत संयोजन महेंद्र ढोले यांचे आहे. किशोर गलांडे कार्यक्रमाचे निवेदन करतील. मनोज जोशी, अॅड. शर्मिला चरलवार, चेतन एलकुंचवार, विजय रामटेके, शशिकांत वाघमारे व रोहिणी पाटणकर हे गायक कलाकार विविध मराठी गीते सादर करणार असून त्‍यांना किबोर्डवर महेंद्र ढोले, तबलाल्‍यावर सचिन ढोमणे, बासरी आणि सेक्सोफोनवर शिवलाल यादव, ऑक्टोपॅडवर सुभाष वानखेडे, ढोलकवर दीपक कांबळे, गिटारवर मनोज विश्वकर्मा व मायनरवर विक्रम जोशी साथ देणार आहेत. हा कार्यक्रम नि:शुल्‍क असून प्रवेशिकांद्वारेच प्रवेश दिला जाणार आहे. रसिकांनी कार्यक्रमाचा आस्‍वाद घ्‍यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुष इन्फ्रा ग्रुप व सह-प्रायोजक डॉ. रिचाज़ युनिक क्लिनिक व २४ फ्राईड क्लब आहेत.