- Breaking News, धार्मिक , नागपुर समाचार

नागपूर समाचार : परशुरामसेनेच्या जयघोषाने दुमदुमली नागपूर नगरी

वाहन रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा उपक्रम

नागपूर समाचार : भगवान श्री परशुराम जन्मोत्सवानिमित्त अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, नागपूरच्या वतीने आयोजित वाहनरॅलीत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला, त्यामुळे रविवारची सकाळ भगवान परशुरामाच्या जयघोषाने दुमदुमली. शहरातील नागरिक जागे होण्यापूर्वीच त्यांच्या कानी परशुरामाचा जयजयकार पडल्याने रॅलीच्या मार्गातील अनेक नागरिक प्रफुल्लीत झाले. विशेष म्हणजे रॅलीच्या वेळी अचानक पावसाला प्रारंभ झाला तरी परशुराम सेनेचा उत्साह कमी न होता तो ओसंडून वाहताना दिसत होता.

रविवारी सकाळी परशुराम सेनेचे महिला, पुरुष, आणि युवक, युवती गोरक्षण येथील गोपालकृष्ण मंदिरात एकत्र झाले. सर्वाची दुचाकी वाहने, त्यावर भगवे झेंडे, भगव्या टोप्या यामुळे संपूर्ण परिसराला एक निराळीच झळाळी जाणवत होती. माजी आमदार प्रा. अनिल सोले आणि प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. विलास डांगरे यांनी मंदिरातील प्रतिमेला माल्यार्पण केले. याप्रसंगी अ. भा. ब्राम्हण महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर मुख्य रथ, शंखनाद करणाèया महिलांचे वाहन आणि दोन डीजे वाहन यांच्या मधोमध वाहनचालक महिला व पुरुष अतिशय शिस्तीत रॅलीत सहभागी झाले.

वाहन रॅली गोरक्षण मंदिर येथून प्रारंभ झाली, त्यानंतर रहाटे कॉलनी चौक, लोकमत चौक, काछीपुरा चौक, कुसुमताई वानखेडे सभागृह, शुभमंगल हॉल भगवाघर धरमपेठ, व्हीआयपी रोड ट्रॅफिक चिल्डृेन पार्क, धरमपेठ झेंडा चौक, गिरीपेठ, मामा रोड, कॉफी हाऊस चौक, रामनगर चौक, लक्ष्मीभुवन चौक, शंकरनगर चौक, अभ्यंकरनगर चौक, माटे चौक, प्रतापनगर चौक , सोमलवार शाळा, ऑरेंजसिटी स्ट्रीट, मालवीयनगर, खामला रोड, ऑरेंज सिटी हॉस्पिटल चौक, देवनगर चौक तात्या टोपे सभागृह आठ रस्ता चौक, अशोका हॉटेल, मार्गे राणी लक्ष्मीबाई सभागृह लक्ष्मीनगर येथे वाहन रॅलीचा समारोप झाला. समारोपिय कार्यक्रमात दयाशंकर तिवारी माजी महापौर यांनी संपूर्ण ब्राह्मण समुदायाला अतिशय उत्तम असे मार्गदर्शन केले . यावेळी श्री संदीप जोशी यांची पण उपस्थिती लाभली.

मार्गात अनेक ठिकाणी पुरुष व महिलांनी औक्षण केले, पेय वाटप केले तसेच रॅलीतील रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

यात प्रामुख्याने विनय दाणी, देवदत्त फडणीस राजू बगे, संजय बंगाले, दत्तात्रेय गारवे, खांडवे गुरुजी, परिणीता फुके, अक्षय पाटील, ऋषिकेश देशपांडे ,मनीष कुलकर्णी, श्रीपाद बोरीकर, दिलीप दिवे, पल्लवी शामकुळे, मकरंद मोरोणे, प्रफुल्ल माटेगावकर, शेखर भागवत, प्रीती भांबुरकर, जितेंद्र शर्मा, गिरीश देशमुख, आनंद टोळ अरविंद गडीकर इत्यादींचा सहभाग होताच परंतु या सर्व परिसरातील मान्यवर व्यक्ती प्रचंड संख्येने उपस्थित होते.

रॅलीमध्ये राजकीय, सामाजिक,आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैद्यकीय, उद्योग आदी क्षेत्रातील सहभाग होता. नागपुरातील सर्व ब्राह्मण संघटनांचा यात विशेष सहभाग होता. अतिशय शिस्त सुंदर नियोजन या रॅलीचे मुख्य संयोजक पराग जोशी व सर्व अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी यांनी आयोजन केले होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *