- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : डॉ. रोमी बिष्ट यांना ‘यंग सायंटिस्ट अवॉर्ड’

नागपूर समाचार : सायकॉलॉजी असोसोसिएशन ऑफ इंडिया व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या 30 व्या SPAI स्पोर्ट्स सायकॉलॉजीच्या राष्ट्रीय परिषदेत डॉ. रोमी बिष्ट यांना ‘यंग सायंटिस्ट अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले तर वृषाली देशमुख व सविओ फ्रान्सिस यांना ‘बेस्ट पोस्टर प्रेसेंटेशन’ चा अवॉर्ड प्राप्त झाला.

डॉ. रोमी बिष्ट यांनी डॉ. माधवी मार्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी केले असून वृषाली यांनाही त्यांचे संशोधन नासाठी मार्गदर्शन लाभत आहे. सविओ हे पीजीटीडी शारीरिक शिक्षण विभागातील विद्यार्थी आहे.तिघांनी या यशाचे श्रेय डॉ माधवी मार्डीकर, चंद्रमोहन बिष्ट, पंकज देशमुख व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना दिले. पीजीटीडी च्या सर्व शिक्षकांनी व विज्ञान संस्थेच्या शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *