- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : ‘सात समुंदर पार’ ने घडविला रेट्रो म्युझिकचा सफर

बॉलिवूड हिट्स रेट्रो म्युझिकल कॉन्सर्ट चे यशस्वी आयोजन 

नागपूर समाचार : ‘सात समुंदर पार’, ‘ओ मेरे दिल के’, गली गली मे फिरता है’, ‘आनेवाला पल’ अश्या एकापेक्षएक सदाबहार गीतांच्या कर्णमधुर प्रस्तुतीने रसिक श्रोत्यांना रेट्रो म्युझिकचा सफर घडविला. श्री सिद्धिविनायक पब्लिसिटी प्रस्तुत’ बॉलिवूड हिट्स रेट्रो म्युझिकल’ कॉन्सर्टचे आज सायंटिफिक हॉल लक्ष्मी नगर नागपूर यशस्वी आयोजन करण्यात आले.

 

कार्यक्रमाची सुरवात शशिकांत वाघमारे आणि सुनील माहूरकर यांनी ‘हे राम’ या भक्ती गीताचे सादरीकरण करून केली. कार्यक्रमाला पाहुण्या गायिका निकेता जोशी यांनी सह -गायकांसह ‘सात समुंदर पार’; गली गली मे फिरता है; रोज रोज आखो तले; क्या खूब लगती हो; चुरा के दिल मेरा अश्या सुमधुर लोकप्रिय गीतांची प्रस्तुती दिली.

लायंस क्लब ऑफ नागपूर हेरिटेज चे अध्यक्ष आणि श्री सिद्धिविनायक पब्लिसिटीचे समीर पंडित यांनी आणि निकेता जोशी यांनी ‘गली गली मे फिरता है’; ‘आके तेरी बाहो मे’; ‘अकेले है तो क्या गम’; ‘ओ हसीना जुल्फो वाली’ अशी अप्रतिम गाणी गाऊन प्रेक्षकांची दाद मिळवली. याशिवाय समीर पंडित यांनी अन्य सह गायकांसोबत देखील विविध गाणी गायली. 

याशिवाय प्रशांत अनवाने यांनी ‘ओ मेहबुबा’; ‘चुरा लिया है तुमने जो दिल को’; ‘रंग बरसे’ या गीतांवर प्रस्तुती दिली. डॉ. प्रवीण जाधव यांनी ‘दुनिया पागल है’, प्रो. सुनील सुभेदार यांनी ‘आनेवाला पल’, ‘तेरी निगहो पे , शशिकांत वाघमारे यांनी ‘का करू सजनी’, ‘बडी सुनी सुनी’; आभा कालकोटवर यांनी ‘तू शायर है’ , ‘आजा सनम मधुर चांदनी’, मनश्री जोशी यांनी ‘कितना प्यारा वादा”, अनघा वैद्य यांनी ‘जीवन के हार मोड पर’ , आशिष पाटील यांनी ‘दिलबर मेरे’, प्रदीप भगत यांनी ‘एक रोज मैं तडप कर’ , सुनील माहूरकर यांनी ‘तुम्हारी नजर’ आणि नरेंद्र माथुरकर यांनी ‘बदन पे सितारे’ अशी सोलो आणि ड्युएट गाणी गायली. या गीतांच्या व्यतिरिक्त अनेक सुप्रसिद्ध गीते गाऊन गायकांनी प्रेक्षकांची मने जिंकली. ‘लायंस क्लब ऑफ नागपूर हेरिटेज’चे या कार्यक्रमाला विशेष सहकार्य लाभले. सर्व गीतांना श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रश्मी बडे यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने रसिक श्रोत्यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *