- नागपुर समाचार

10 मार्च ला नरेडको विदर्भचे रेराकॉन (रेरा कार्यशाळा) चे भव्य आयोजन

10 मार्च ला नरेडको विदर्भचे रेराकॉन (रेरा कार्यशाळा) चे भव्य आयोजन

नागपूर: नरडेको विदर्भ यांच्या वतीने शुक्रवारी 10 मार्च रोजी रेराकॉनचे आयोजन चिटणविस सेंटर येथे करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख अतिथी व वक्ता म्हणून महारेराचे अध्यक्ष अजॉय मेहता, नरडेकोचे राष्ट्रीय अध्यक्ष राजन बांधेलकर, महरेरा नागपूर विभागाचे उप सचिव संजय भिमनवार, ग्राहक पंचायत तर्फे Adv. गौरी चंद्रयान, तसेच रेमी चे पूनित चोवटिया (एजंट प्रशिक्षण कार्यक्रम) हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. नरडेको ही बांधकाम व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांची संस्था असून त्यांना त्याविषयक येणाऱ्या अडचणी दूर करण्याचे काम करते. बांधकाम व्यावसायिकाना त्याचे प्रश्न व सरकारी कामकाजात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी काम करते आहे. या कार्यक्रमात रेरा विषयक अडचणी, त्याचे नोंदणी, तरतुदी, पूर्तता अन्य विषयावर अजॉय मेहता हे मार्गदर्शन करणार आहे. रेरा विषयक येणाऱ्या शंकांचं निरसन ते करणार आहे. या कार्यक्रमात बिल्डर्स, सनदी लेखापाल, वास्तू विशारद, वकील सहभागी होऊ शकतात. या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त लोकांनी नोंदणी करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. पत्रकार परिषदेला नरडेकोचे विदर्भ अध्यक्ष घनश्याम ढोकणे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष हितेश ठक्कर, बादल माटे, कुणाल पडोळे, ब्रिजमोहन तिवारी, राहुल बोंद्रे, अजय बोरकर, अतुल श्रीराव नितीन देठे, सचिन मेहेर, स्क्यालाब भानारे, उन्मेष इंगळे, अभिनव वेलेकर पंकज ठाकरे यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *