नागपूर समाचार : धरमपेठ पॉलिटेक्निक मध्ये ‘फ्युजन २०२३’ स्नेहसंमेलन चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. अंबाझरी पोलिस स्टेशनचे पोलिस सब इन्स्पेक्टर श्री साईप्रसाद केंद्रे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
मंचावर धरमपेठ शिक्षण संस्थेचे सचिव मा. श्री मंगेश फाटक, धरमपेठ पॉलिटेक्निकचे चेअरमन श्री सुरेश देव आणि प्राचार्या श्रीमती मीता फडणवीस प्रामुख्याने उपस्थित होते.
दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्वागत गीतानंतर ‘HORIZON’ या वार्षिकांकाचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी श्री साईप्रसाद केंद्रे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर सकारात्मक दृष्टिकोन बाळगणे आवश्यक आहे तसेच व्यसने, गुन्हे यापासून दूर रहा असा सल्ला त्यांनी या प्रसंगी दिला.
याप्रसंगी विशेष गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. त्यानंतर विविध गुणदर्शनाचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या सफलतेकरिता श्रीमती साधना मोटवानी आणि श्री रोशन धवड यांच्या मार्गदर्शनात धरमपेठ पॉलिटेक्निकच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.



