- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : जागतिक महिला दिनानिमित्त, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक तर्फे स्तन कर्करोग जागरूकता रैली

नागपूर समाचार : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून, मा. श्री. गिरीश महाजन, वैद्यकिय शिक्षण मंत्री, वैद्यकिय शिक्षण विभाग मंत्रालय महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांचे मार्फत बुधवार दि. 8 मार्च 2023 रोजी ‘स्तन कर्करोग जागरूकता आणि उपचार जनजागृती रैली आयोजित करण्यात आली होती.

रॅलीचे उद्‌घाटन डॉ. श्रीमती वंदना काटे, निर्वाचित अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन नागपूर यांचे हस्ते सकाळी 9:00 वाजता एनकेपी साळवे वैद्यकिय महाविद्यालय, नागपूर येथून सुरवात करण्यात आली. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या 25 वर्षपूर्ण झाल्यानिमित्त राज्यमहोत्सवी वर्ष साजरे होत आहे. यास्तव वर्षभर विविध आरोग्य विषयक कार्यक्रम होणार आहेत.

आधुनिक काळात स्तनाचा कर्करोग हा स्त्रियांमध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा रोग आहे. प्राथमिक अवस्थेत निदान आणि उपचार केल्यास तो संपूर्ण बरा होऊ शकतो. त्यासाठी रोगाची लक्षणे, तपासण्या माणि त्याचे उपचार यासंदर्भात महिलांमध्ये जागरुकता निर्माण करणे, हे या रॅलीचे उद्दिष्ट आहे. करिता डॉ. गायत्री देशपांडे, शासकिय वैद्यकिय महाविद्यालय, नागपूर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. तसेच व्ही.एस.पी. एम.च्या विद्यार्थ्यांनी जनजागृतीकरिता पथनाट्य सादर केले.

उपरोन रॅली मध्ये नागपुर विभागात विविध शाखेचे खालीलप्रमाणे महाविद्यालयात विद्यार्थी तसेच अध्यापक वृंद सहभागी झाले होते. एन.के.पी. साळवे मेडिकल कॉलेज, व्ही.एस.पी.एम. डेंटल कॉलेज, श्री आयुर्वेद महाविद्यालय, भाऊसाहेब मुळक आयुर्वेद कॉलेज, बुटीबोरी, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, दत्ता मेघे आयुर्वेद कॉलेज, शासकिय डेंटल कॉलेज, शूअरटेक नर्सिंग कॉलेज व होमिओपॅथी कॉलेज, श्री. आर. के. पांडव आयुर्वेद महाविद्यालय, आशा राम नर्सिंग कॉलेज, मिळून जवळपास 1000 विद्यार्थी व 40 शिक्षक सहभागी झाले होते.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून प्रभारी अधिष्ठाता डॉ. नितिन देवस्थळे तसेच विविध विभाग प्रमुख व शिक्षक वृंद उपस्थित होते. ही रॅली यशस्वी करण्याकरिता विद्यापीठ समन्वयक म्हणून डॉ. अनिरुध्द देवके, डॉ. किरण टवलारे व डॉ. विवेक घोंगडी यांनी अथक परिश्रम केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *