- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : निक्षय मित्र बना, क्षयरुग्णांना पोषण आहाराची मदत करा – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर  

नागपूर समाचार : समाजातील विविध भागधारक संस्था, कॉर्पोरेट्स, इंड्सस्ट्रिज, प्रतिष्ठित नागरिक व लोकप्रतिनिधी, एनजीओ, सिव्हिल सोसायटी, संस्था, व्यक्ती, व्यावसायिक संघटना, रोटरी क्लब, लायन्स क्लब, इनरव्हील क्लब व सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSUs) आदी दाते (Nikshay Mitra) यांनी क्षयरुग्ण पालकत्व स्वीकारुन अतिरिक्त पोषण आहार सहाय्यता करण्यासाठी पुढाकार घ्या, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज येथे केले.

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम व नियमित लसीकरण आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नियामक मंडळाची संयुक्त बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली, यावेळी ते बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृती राठोड, डॉ. हर्षा मेश्राम, डॉ. आसिफ इनामदार तसेच समिती सदस्य यावेळी उपस्थित होते.

प्रधानमंत्री टिबी मुक्त भारत अभियान हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचा नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. या अभियानाचे उद्घाटन भारताचे राष्ट्रपती महामहीम द्रोपदी मुर्मु यांचे हस्ते करण्यात आले आहे. तसेच याबाबत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांनी आव्हान केले आहे. ज्या क्षयरुग्णांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे, अशा क्षयरुग्णांना 6 महिने ते 3 वर्षापर्यत अतिरिक्त पोषण आहार (Additional nutritional Support) ची सहाय्यता मिळवून देण्याकरीता शासनाने हा उपक्रम जाहीर केला आहे.

यासाठी केंद्र शासनाने उपचार घेणाऱ्या क्षयरुग्णांना पोषणासाठी (कोरडे शिधा) दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनसार प्रती क्षयरुग्ण, प्रती माह कमीत कमी पाचशे रुपये खर्च येतो. या माध्यमातून उद्योग क्षेत्रातील कोणतीही कंपनी (व्यापारी मंडळे) क्षयरुग्णांना आहार पुरवठ्यासाठी दत्तक घेतील व संमती दिलेल्या क्षयरुग्णांना दरमाह पूरेल एवढा आहार मिळेल. या प्रकरणी विविध उद्योगांनी नि-क्षय पोर्टलवर Community Support to TB Patient अंतर्गत Nikshay Mitra म्हणून नोंद करणे आवश्यक आहे. याकरिता सन 2025 पर्यंत क्षयरोगाचे पूर्णपणे उच्चाटन करण्यासाठी विविध घटकाचा व सामुदायचा सहभाग वाढविणे गरजेचे आहे, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले. 

जिल्ह्यात एकूण 1600 क्षयरुग्ण आहेत. त्यापैकी आज 550 निक्षय मित्र बनविण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या पुढाकाराने महसूल अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या वतीने 30 क्षयरुणांचे निक्षय मित्र बनून 1 लाख रुपयांची मदत करण्यात आली. हिंगणा येथील 118 व कामठी येथील 300 क्षयरुग्णांना तेथील लोकप्रतिधींना निक्षय मित्र करण्यासाठी आवाहन करण्यात आले. 

तालुकास्तरावर प्राप्त रक्कमेचा हिशोब तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी नियमित ठेवावा. तसेच नोंद ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. नियमित लसीकरण, जागरुक बालक सुदृढ बालक मोहिम आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा आढावा त्यांनी यावेळी घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *