- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : शहरात सुसज्ज वेलनेस फोरएव्हर स्टोअर्सचे शानदार उद्घाटन

शहरात सुसज्ज वेलनेस फोरएव्हर स्टोअर्सचे शानदार उद्घाटन

नागपूर समाचार : रोगांची वाढती संख्या आणि त्यावर उपायकारक असणारी औषधे सहजरीत्या नागरिकांना उपलब्ध व्हावी आणि ती पण 24 तास या हेतुने शहरात धरमपेठ येथील ट्रॅफिक पार्क जवळ नुकतेच मुंबईच्यां वेलनेस फोरएव्हर च्या शाखेच्या उद्घाटन सोहळा पार पडला.

या सुसज्ज वेलनेस फोरएव्हर चा लाईफ स्टाईल स्टोअर्सचे उद्घाटन दक्षिण नागपूर चे आमदार श्री. मोहन मते यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी पूर्व पालकमंत्री श्री. सतिशबाबू चतुर्वेदी, आमदार श्री. विकास कुंभारे, माजी आमदार श्री. गिरीश व्यास, श्री. वसंतराव घुईखेडकर, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन मुंबई, श्री. सूनिलराव डिके, प्रा. गव्हरमेंट पॉलटेकनिक नागपूर तसेच स्टोअर्सचे संचालक श्री. विक्रांत डिके आणि सौ. सेजल डिके (घुईखेडकर) सहीत आदि मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

कोरोना काळात सर्वसामान्यांचा जीव ओढाताणीत मेटाकुटीस आलेला पाहता तसेच शहरातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक यांना सहजरीत्या घरपोच औषधे उपलब्ध करुन देणे या हेतुने श्री. विक्रांत डिके आणि सौ. सेजल डिके (घुईखेडकर) यांनी या स्टोअर्सचा नागरिकांचा सेवेत शुभारंभ केला आहे. औषधांची सेवा तसेच सामान्य प्रोडक्ट या नागरिकांना निःशुल्क आणि चोवीस तास पांच किलोमीटर अंतरावर पर्यन्त मिळणार आहे. स्टोअर्सचे उद्घाटन प्रसंगी पूर्व मंत्री श्री. अनिल देशमुख यांनी स्टोर ला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

वेलनेस फोरएव्हर या अशा सुसज्ज आणि 1000 स्केअर फूट असलेल्या स्टोअर्स मध्ये औषधांसह जनरल प्रॉडक्ट, हेल्थड्रिंक, सौंदर्य प्रसाधने इत्यादी वस्तू ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. स्टोअर्सचे उद्घाटन समारंभ प्रसंगी स्टोअर्स चे संचालक श्री. विक्रांत डिके आणि सौ. सेजल डिके (घुईखेडकर) यांनी उपस्थित मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच औषधे उपलब्ध करुन दिल्याबद्दल उपस्थितांनी डिके परिवाराचे आभार मानून त्यांना शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *