- Breaking News

प्रबोधनाची चळवळ ही महाराष्‍ट्राची देण – डॉ. श्रीकांत तिडके ‘महाराष्‍ट्राची प्रबोधन परंपरा’ विषयावर परिसंवाद 

नागपुर: भारतात प्रबोधनाची चळवळ ही फ्रेंच क्रांतीतून उद्यास आली असे बोलले जाते. परंतु, ते खरे नसून महाराष्‍ट्रांतील संतांनी ही चळवळ सुरू केली, असे प्रतिपादन ज्‍येष्‍ठ संत साहित्‍य‍िक श्रीकांत तिडके यांनी केले. 

96 व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाच्‍या पहिल्‍या द‍िवशी प्राचार्य राम शेवाळकर व्‍यासपीठावर उद्घाटन सत्रानंतर कर्मयोगी गाडगेबाबा आणि राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज आणि महाराष्‍ट्राची प्रबोधन परंपरा विषयावर परिसंवाद पार पडला. डॉ. श्रीकांत तिडके अध्‍यक्षस्‍थानी होते तर रेखा नार्वेकर, वासुदेव वले, डॉ. हनुमंत भोपाळे व डॉ. रमेश जलतारे यांनी यात सहभाग नोंदवला.

लोकांमध्‍ये असलेली अंधश्रद्धा दूर करण्‍यात संतांचे मोठे योगदान राहिले असून अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा केवळ महाराष्‍ट्राने स्‍वीकारला याचे पूर्ण श्रेय संत गाडगे महाराजांना जाते, असे सांगताना श्रीकांत तिडके म्‍हणाले.  

संत गाडगेबाबा, राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्‍या विचारांचा झेंडा तेजस्‍वीरित्‍या फडकवत ठेवला आहे, असे मत रेखा नार्वेकर यांनी व्‍यक्‍त केले. इतर मान्‍यवरांनीदेखील आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्‍योती भगत यांनी केले तर डॉ. शोभा बेलखोडे यांनी आभार मानले. 

कथाकथनाला उत्‍तम प्रतिसाद

सहकार महर्षी बापूरावजी देशमुख व्‍यासपीठात आयोजित करण्‍यात आलेल्‍या कथाकथनाला रसिकांचा उत्‍तम प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी डॉ. सुनंदा गोरे होत्‍या तर एकनाथ आव्‍हाड, अर्जुन व्‍हटकर, विलास सिंदगीकर, अशोक मानकर, प्रिया जोशी, गजानन देसाई यांचा यात सहभाग होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री अंबासकर यांनी केले तर प्रा. प्रमोद नारायणे यांनी आभार मानले. 

………

आज साहित्‍य संमेलनात…

आचार्य विनोबा भावे सभामंडप

सकाळी 9.30 वाजता – डॉ. अभय बंग यांची प्रकट मुलाखत 

सकाळी 11 वाजता – भारतीय व जागतिक साहित्‍यविश्‍वात मराठीची ध्‍वजा फडकावणारे अनुवादक’ विषयावर परिसंवाद

दुपारी 1.30 वाजता – कृषिजीवनातील अस्थिरता, प्रक्षोभ आणि मराठी लेखक’ विषयावर परिसंवाद

दुपारी 3.30 वाजता – ‘मराठी साहित्‍यातील उद्यम व अर्थविषयक लेखन’ विषयावर परिसंवाद

सायं. 5.30 वाजता – मुक्‍त संवादमध्‍ये नागराज मंजुळे व कवी सौमित्र यांची उपस्‍थ‍िती 

रात्री 8.00 वाजता – निमंत्रितांचे कविसंमेलन 

 

मनोहर म्‍हैसाळकर सभामंडप

सकाळी 11.00 वाजता – ‘ग्रंथालय चळवळींचे यशापयश’ विषयावर परिसंवाद

दुपारी 1.30 वाजता – ‘स्‍त्री-पुरूष तुलना’ विषयावर परिचर्चा

दुपारी 3.30 वाजता – ‘समाजमाध्‍यमांतील अभिव्‍यक्‍ती’ विषयावर परिसंवाद

सायं. 5.30 वाजता – ‘वैदर्भीय वाडमयीन परंपरा’ विषयावर परिसंवाद 

सायं. 7.30 वाजता – एकांक ‘गावकथा’

 

इतर कार्यक्रम 

सकाळी 9.00 वाजेपासून – स्‍व. मनोहर म्‍हैसाळकर स्‍मृती वैदर्भीय काव्‍यनक्षत्रमाला

दुपारी 2.00 वाजता – वं. मावशी केळकर वाचन मंचाचे उद्घाटन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *