- Breaking News, नागपुर समाचार, मनपा

नागपुर समाचार : नायलॉन मांजा, प्लास्टिक पतंगच्या विरोधात मनपाची कारवाई

नायलॉन मांजा, प्लास्टिक पतंगच्या विरोधात मनपाची कारवाई

नागपूर समाचार : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (ता.9) 5 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 35 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 1 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 5,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 1 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.

तसेच नायलॉन मांजाच्या विरोधात 98 आस्थापनेची तपासणी करण्यात आली. धंतोली झोन अंतर्गत इंदिरानगर येथील पतंग दुकानातुन 20 प्लास्टिक पतंगे जप्त करुन 1000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल गांधीबाग झोन अंतर्गत टिमकी, मोमीनपुरा येथील गणपती सोनपापडी यांच्याविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

त्याचप्रमाणे धरमपेठ झोन अंतर्गत प्रभाग न.13, अभ्यंकर नगर येथील M/s Green Serenity यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

धंतोली झोन अंतर्गत प्रभाग न. 35, श्रीनगर येथील नारायणी इन्फ्रास्ट्रक्चर यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच बस स्टँन्ड जवळ, राहुल कॉम्प्लेक्स, गणेशपेठ येथील M/s Enhance Coaching Classes यांच्याविरुध्द परवानगिशीवाय विद्युत खांबावर बॅनर आणि होर्डिंग्ज लावल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. आशीनगर झोन अंतर्गत प्रभाग न.02, पॉवर ग्रीड चौक येथील M/s SIP Abacus यांच्याविरुध्द परवानगिशीवाय विद्युत खांबावर बॅनर आणि होर्डिंग्ज लावल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *