- Breaking News

नागपुर समाचार : शासकीय निवासी शाळेत समता पर्व उत्साहात

शासकीय निवासी शाळेत समता पर्व उत्साहात

नागपुर समाचार : सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलामुलींच्या शासकीय निवासी शाळेत महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर कालावधी ‘समता पर्व’ म्हणून साजरा करण्यात आला. या निमित्ताने 6 डिसेंबर रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी व कर्मचाऱ्यांनी प्रास्तविकेचे वाचन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भारताच्या घटना निर्मितीमध्ये अमूल्य योगदान या विषयावर विद्यार्थ्यांना माहितीपट दाखविण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रजनीकांत नंदनवार यांनी तर संचालन विशाखा गणोरकर यांनी केले. आभार प्रदर्शन प्रीती पाटील यांनी केले. कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *