शाळा, कॉलेज, धार्मिक स्थळांची उपद्रव शोध पथकाव्दारे तपासणी
नागपूर समाचार : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता. २१ ऑक्टोंबर) रोजी ०४ प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. ३५,००० चा दंड वसूल केला. पथकाने ४८ मंगल कार्यालय, २४ मंदीरे, १० मस्जिद, ४४ शाळा व कॉलेज आणि अन्य १२ धार्मिक स्थळांची पाहणी करुन एकूण १३८ स्थळांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.




So, Not sure how I ended up here. It explained things better than most sites I’ve seen, without making it overly complicated.