- Breaking News

वाइन शॉप ची नावे बदलणार; राज्य शासनाचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने मुंबई विदेशी मद्य नियम १९५३ मध्ये सुधारणा केली आहे.

Written by

NBP- NEWS 24 Team

नागपुर:- राज्य शासनाने मुंबई विदेशी मद्य नियम १९५३ मध्ये सुधारणा केली आहे. त्यानुसार आता विक्रेत्यांना दुकानाच्या नामफलकावर ‘विदेशी मद्य विक्री दुकान’ असे लिहावे लागेल.

‘ ‘वाईन’ ऐवजी मद्य विक्री दुकान असा नामबदल करा, अशी मागणी किसान ब्रिगेडने केली होती. याची दखल शासनाने घेतली, असे किसान ब्रिगेडचे अध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पोहरे म्हणाले, ‘वाईन’ ही फळांपासून तयार होते. यात अल्कोहोलचे प्रमाण अत्यल्प असते. यापासून शेतकऱ्यांना रोजगार मिळतो. मात्र, दुकानांमध्ये ‘वाईन’पेक्षा अन्य विदेशी मद्याची अधिक विक्री होते. तरीही त्याला ‘वाईन शॉप’ म्हणूनच ओळखले जाते. त्यामुळे ‘वाईन शॉप’ या नावात बदल करावा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्य सरकारकडेही केली होती. ती मान्य झाली.

आता मद्य दुकानाच्या नामफलकावर देवनागरीमध्ये ‘विदेशी मद्य विक्री दुकान’ असे लिहावे लागणार आहे. पुढील आठ दिवसांत सर्व मद्य विक्रेत्यांनी नामफलकामध्ये बदल करावा, असे आवाहन पोहरे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.