- Breaking News

सहाव्या जागेवरील नाट्यमय लढतीत भाजपचा विजय पहाटेच्यावेळी पुन्हा उद्धव ठाकरेंना झटका

मुंबई : विजयासाठी आवश्यक हक्काची मते नसतानाही भाजप उमेदवाराने विजय मिळवल्याने देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीती राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा होत आहे. राज्यसभेच्या पाच जागांपैकी तीन जागा जिंकण्यासाठी लागणारी पुरेसी मते महाविकास आघाडीकडे होती, तर दोन जागांसाठीची मते भाजपकडे होती. या पाच जागांचा अपेक्षित निकाल लागला. शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे इमरान प्रतापगढी हे विजयी झाले आहेत.

भाजपच्या पियूष गोयल आणि अनिल बोंडे यांनाही विजय खेचून आणण्यात यश आलं आहे. सहाव्या जागेवर धनंजय महाडिक यांनी विजय मिळवल्याने भाजपकडे एकूण तीन जागा गेल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.