- नागपुर समाचार, राज्य

‘रोहित तू बिंदास्त जा, तुझं काम झालं असं समज’, गडकरींच्या कामाने RR आबांचा लेक भारावला.

तासगावमधल्या एका महत्त्वाच्या रस्त्याचं काम घेऊन स्व. आर आर पाटील यांचा लेक, राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. यावेळी रोहित पाटील यांनी आपली समस्या गडकरींच्या कानावर घातली. गडकरींनी रोहित यांचं म्हणणं ऐकून घेऊन त्यावर लगेच होकारार्थी मान डोलावली. “रोहित तू बिंदास्त जा… तू सांगितलेलं काम झालं असं समज”, असा लगोलग रिप्लाय गडकरींनी रोहित पाटील यांना दिला.

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Nitin Gadkari आपल्या धडाकेबाज कामासाठी ओळखले जातात. म्हणून तर पक्षातील लोकांसह विरोधी पक्षातील नेतेही त्यांच्या कामाचे दिवाने आहेत. आज स्व. आर आर पाटील यांचे सुपुत्र, राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील (Rohit Patil) यांनाही गडकरींच्या झंझावाती कामाचा असाच अनुभव आला. त्यांनी गडकरींचं कौतुक करणारी आणि आभार मानणारी फेसबुक पोस्ट लिहिली आहे.
RR Patil Son Rohit patil Facebook Post on union minister nitin Gadkari
रोहित पाटील यांनी नितीन गडकरी यांची भेट घेतली

‘रोहित तू बिनधास्त जा, तुझं काम झालं असं समज’, गडकरींच्या कामाने RR आबांचा लेक भारावला
तासगावमधल्या एका महत्त्वाच्या रस्त्याचं काम घेऊन आर आर पाटील यांचे लेक, राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांनी आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. यावेळी रोहित पाटील यांनी आपली समस्या गडकरींच्या कानावर घातली. गडकरींनी रोहित यांचं म्हणणं ऐकून घेऊन त्यावर लगेच होकारार्थी मान डोलावली. “रोहित तू बिंदास्त जा… तू सांगितलेलं काम झालं असं समज”, असा लगोलग रिप्लाय गडकरींनी रोहित पाटील यांना दिला. त्यानंतर ‘दिल्लीमध्ये महाराष्ट्र असणं गरजेचं आहे’ या वाक्याची प्रचिती आल्याचं रोहित पाटील यांनी म्हटलंय.

रोहित पाटील यांनी फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटलंय?
“आज दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांची भेट घेऊन मतदारसंघातील महत्त्वाच्या विषयांबाबत चर्चा केली. तासगाव बाह्यवळण रस्ता हा प्रस्तावित असून काही काम अपूर्ण राहिले आहे. स्व. आबा असताना ह्या रस्त्याचं काम पूर्ण करण्याचा मानस त्यांचा होता. ह्या रस्त्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांना व नवीन तरुणांना नवीन व्यवसाय चालू करण्यासाठी संधी उपलब्ध या रस्त्यामुळे होऊ शकते आणि शहरातील दळणवळण साठी अत्यंत फायदेशीर होऊ शकतो हे गडकरी साहेबांना पटवून दिले.”
“त्यामुळे सदर रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग म्हणून ग्राह्य केला जावा अशी विनंती त्यांना केली. नक्कीच हा बाह्यवळण रस्ता तासगावच्या विकासासाठी नवी नांदी असेल हा विश्वास मला आहे. त्याचबरोबर कवठेमहांकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडी (नगज- सांगोला महामार्ग) येथे ब्रीज अंडरपास उपलब्ध करून दिला जावा अशी विनंती केली. सदर दोन्ही कामांसाठी त्यांनी सकारात्मक दृष्टीने निर्देश दिले असून लवकरच हे दोन्ही काम होतील अशी हमी दिली. त्याचबरोबर साहेबांनी कवठेमहांकाळ नगरपंचायती बाबत माहिती घेऊन अभिनंदन केले. ‘दिल्लीमध्ये महाराष्ट्र असणं गरजेचं आहे’ या वाक्याची प्रचिती आली. रोहित तू बिंदास्त जा तू सांगितलेलं काम झालं असं समज”, असंही गडकरी साहेब म्हणाल्याचं रोहित पाटील यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.