- Breaking News

स्माईल ट्री फाउंडेशन द्वारे जागतिक महिला दिनानिमित्त निःशुल्क मेडिकल कँप संपन्न

नागपूर – दिनांक 13 मार्च 2022 स्माईल ट्री फाउंडेशन द्वारे रविवार दिनांक 13 मार्च 2022 ला जागतिक महिला दिनानिमित्त निःशुल्क मेडिकल कँप जिल्हा परिषद शाळा, बेसा येथे घेण्यात आला. या प्रसंगी नागरिकांसाठी ब्लड प्रेशर, वजन, हिमोग्लोबिन, मधुमेह, थायरॉईड, संपूर्ण शरीरात कॅल्शियम पातळी, जनरल हेल्थ चेकप इत्यादी विविध प्रकारच्या तपासणी या शिबिराच्या माध्यमातून राबविण्यात आल्या

.या निःशुल्क रोगनिदान शिबिर मधे डॉ.अमित ओहल, डॉ योगिता शिवास* यांचे सहकार्य फाउंडेशन ला लाभले. त्याचप्रमाणे याच दिवशी स्माईल ट्री फाउंडेशन च्या वतीने स्वाधार वसतिगृह मधे मुलींसाठी सेनीटरी पॅडे, लहान मुलांना बुक्स स्टेशनरी किट, तसेच स्मिता नेरकर यांना दोन मुले आहेत वय वर्ष 8 आणि वय वर्ष 6. परंतु दोन्ही मुले सिपि चाईल्ड असल्यामूळे स्माईल ट्री फाउंडेशन च्या वतीने त्याच्या दोन्हीं मुलाना विद्यार्थ्यांना ओषधी मदत मोठ्या प्रमाणमध्ये करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्माईल ट्री फाउंडेशन च्या अध्यक्षा मा. स्वाती वंजारी मॅडम यांनी केले. प्रस्तावना मा. शालिनी कंगाली मॅडम ( सचिव ), आभार मा. रिता शर्मा मॅडम ( कोषाध्यक्ष ), तसेच मा. संगीता गावंडे मॅडम यांनी उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांचे पुष्प देऊन स्वागत केलेत.

Leave a Reply

Your email address will not be published.