नागपुर समाचार : लोकनेते दत्ता मेघे यांनी राजकारणात असतानाही पूर्णवेळ समाजकारण केले. अशी माणसे दुर्मिळ असतात आणि दत्ताभाऊ राजकारणातील दुर्मिळ व्यक्तिमत्व होते, या शब्दांत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी स्व. दत्ता मेघे यांना श्रद्धांजली अर्पण केली.
केंद्रीय मंत्री श्री. गडकरी पुढे म्हणाले की, आपल्या आयुष्याच्या सुरुवातीला दत्ताभाऊंनी जे दुःख सोसले, त्याचा त्यांना कधीही विसर पडला नाही. अखेरच्या श्वासापर्यंत समाजातील गोरगरिबांबद्दल त्यांच्यातील संवेदनशीलता जागृत होती. अडचणीत असलेली व्यक्ती त्यांच्याकडे आली तर ती कधीही रिकाम्या हाताने परत जात नसे. प्रत्येकाच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिले, असे केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यावेळी म्हणाले.




