- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाकडून नितीन फुल्लुके यांचे अभिनंदन

उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केले सन्मानित

नागपूर समाचार : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भारतीय माहिती सेवेसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत निवड झालेले नितीन फुल्लुके यांचा महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगामार्फत सत्कार करण्यात आला. आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी फुल्लुके यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत राष्ट्रीय स्तरावर वीस पदांसाठी भारतीय माहिती सेवेसाठी परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये नागपुरातील नितीन फुल्लुके यांची निवड झाली. या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी आनंद व्यक्त करीत नागपुरातील रविभवन येथे नितीन फुल्लुके यांचा सत्कार केला. मुळचे गोंदिया जिल्ह्यातील असलेले नितीन फुल्लुके यांचे हे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. समाजातील अनेक विद्यार्थ्यांना या यशामुळे प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळेल व त्यांना देखील पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन मिळेल, असा विश्वास यावेळी आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी मोनाल थूल, सौरभ नाखले हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *