कर्मवीर दादासाहेब कुंभारे जन्मशताब्दी महोत्सव २२ मार्च पासुन सुभारंभ
कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांच्या शिल्पाचे अनावरण,
ड्रॅगन पॅलेस मेट्रो स्टेशन, पर्यटक यात्री निवास, आंतरराष्ट्रीय पर्यटक अतिथीगृह इत्यादी प्रकल्पाचे
भुमीपूजन
दादासाहेब कुंभारे यांच्या जिवनावर आधारीत “कर्मवीर” स्मरणीकेचे २३ मार्च रोजी प्रकाशन
नागपूर/कामठी : माजी सांसद सदस्य व कामगारांचे हृदयसम्राट कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांच्या जन्मशताब्दी निमित्त विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे कर्मवीर अॅड. दादासाहेब कुंभारे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उभारलेल्या सामाजिक न्यायाच्या ऐतिहासिक लढयातील अत्यंत निष्ठावंत, निर्भीड, निश्चयी, निःस्पृह व थोर संघर्षशील लोकनेते म्हणून ख्यातकीर्त आहेत. ‘बिडी मजूर चळवळ’ व ‘आंबेडकरी चळवळ या दोन्ही आंदोलनांतील त्यांचे योगदान अतुलनीय आहे कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांनी सर्वस्वी त्याग करून दलित, शोषित, वंचित तसेच मजूर-व – कामगारांना त्यांचे कायदेशीर हक्क व अधिकार प्राप्त करून देण्यासाठी आजीवन संघर्ष केला. कर्मवीर दादासाहेब कुंभारे एक कुशल संघटक, उत्कृष्ट संसदपटू, मजूरांचे सजग कल्याणमित्र, अजातशत्रु, सत्यान्वेषी लेखक, साक्षेपी विचारवंत, युगद्रष्टे कवी व बिडी कामगारांचे हृदयसम्राट होते लढवय्या लोकनेता म्हणून त्यांचे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रांतील योगदान अतुलनीय आहे
व बुधवार दिनांक २२ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ४.०० वाजता कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांच्या शिल्पाचे अनावरण केंद्रीय मंत्री सडक परिवहन व राजमार्ग, भारत सरकार मा. ना. श्री. नितीनजी गडकरी यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस राहतील, या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री, सामाजिक न्याय विभाग, भारत सरकार मा. ना. रामदास आठवले, व खासदार व माजी केंद्रीय मंत्री, मा. प्रफुल्लभाई पटेल यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. खासदार श्री कृपाल तुमाने, कामठी विधानसभेचे आमदार श्री. टेकचंद सावरकर, माजी मंत्री, मा. नसीम खान, तसेच, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे महाप्रबंधक ब्रिजेश दिक्षीत,, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्यचे प्रधान सचिव, श्री मा. सुमंत भांगे यांची सुध्दा प्रमुख उपस्थिती राहणार आहे या प्रसंगी ड्रॅगन पॅलेस मेट्रो स्टेशनचे भुमीपूजन केंद्रिय मंत्री मा. ना. श्री. नितीनजी गडकरी यांच्या शुभ हस्ते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे तसेच विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे देशाच्या कानाकोप-यातुन येणा-या भावीकांकरिता पर्यटक यात्री निवास तसेच देश-विदेशातुन येणा-या पर्यटकांकरिता आंतरराष्ट्रीय पर्यटक अतिथीगृह वे भुमीपूजन सुध्दा संपन्न होणार आहे.



