- Breaking News, नागपुर समाचार, सामाजिक 

नागपूर समाचार : सावित्रीबाई फुले महिला मंचद्वारे हळदी-कुंकवाचा कार्यक्रमाचे आयोजन

सावित्रीबाई फुले महिला मंचद्वारे हळदी-कुंकवाचा कार्यक्रमाचे आयोजन

नागपूर समाचार : रोजी महाराणा नगर व साई मंदिर आणि एकता नगर या ठिकाणी सावित्रीबाई फुले महिला मंचच्या अध्यक्षा ऍड सौ स्नेहल बंडूजी ठाकरे द्वारे हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न लतादीदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊन केली.

त्याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून सौ वृंदाताई विकासजी ठाकरे (राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ नागपूर शहराध्यक्ष) सौ मीनाक्षी गतपणे सौ हर्षाताई चौधरी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड सौ स्नेहल बंडूजी ठाकरे यांनी केले. याप्रसंगी बर्‍याच महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे व्यवस्थापन सौ सुजाता पातोडे सौ सुवर्णा पाटील सौ प्रणिता काळे नंदाताई सरदार सौ सुनीताताई कळंबे यांनी केले.

या कार्यक्रमाला समाजसेवक श्री बंडू भाऊ ठाकरे श्री राम भाऊ कळंबे श्री स्वप्निल भाऊ पातोडे श्री अविनाश भाऊ पाटील श्री ज्ञानेश्वर पाटील श्री रमेश भाऊ आखरे श्री विष्णू भाऊ बोंद्रे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.