- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : आ. बावनकुळे यांची नरखेड पंचायत समितीला भेट

आ. बावनकुळे यांची नरखेड पंचायत समितीला भेट

नागपूर समाचार : विधान परिषदेचे सदस्य म्हणून शपथ घेतल्याबरोबर आजपासून आ चंद्रशेखर बावनकुळे यांनी ग्रामीण भागाचा दोरा करून नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या. आ बावनकुळे यांनी आज नरखेड पंचायत समितीत बैठक घेतली व मोहपा नगर परिषद येथेही नागरिकांशी संवाद यावेळी पदाधिकाऱ्यांसोबतही संवाद साधला आणि त्यांच्या समस्या समजून घेतल्या.

यावेळी सभापती पंचायत समिती नरखेड सौ. नीलिमाताई सतीशजी रेवतकर, किशोरजी रेवतकर, संदीपजी सरोदे , श्री उकेशजी चव्हाण, श्री मनोजजी कोरडे, श्यामरावजी बाराई, संजयजी कामडे, प.स सदस्य, पंचायत समिति कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

नगर परिषद मोहपा आज मोहपा नगर परिषद येथे भेट दिली. यावेळी मान्यवर नगरसेवकांसोबत संवाद साधला आणि त्यांच्या समस्या समजून घेतल्या. यावेळी मुख्याधिकारी मा. पल्लवीताई राउत, श्री उकेशजी चव्हाण, सुरेशजी खसारे,स्वप्नीलजी नागपुरे, श्री इस्नमाईलजी बारूदवाले, श्री रवीजी मालोदे, नगरपरिषद कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published.