- नागपुर समाचार

२४ से २७ डिसेंबर २०२१ दरम्यान रेशीमबाग ग्राउंड येथे” ऍग्रोव्हिजन २०२१ – समृद्ध शेतीचे स्मार्ट व्हिजन ” होणार।

नागपूर:- शनिवार 11 डिसेंबर रोजी २४ से २७ डिसेंबर २०२१ दरम्यान रेशीमबाग ग्राउंड, नागपुर येथे आयोजित होणाऱ्या मध्य भारतातील सर्वात मोठे कृषि संमेलन , भव्य राष्ट्रीय कृषी प्रदर्शन व कार्यशाळा – ” ऍग्रोव्हिजन २०२१ – समृद्ध शेतीचे स्मार्ट व्हिजन ” संबंधात केंद्रिय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी पत्रकार परिषदेत प्रसार माध्यमांशी मुक्त संवाद साधला.

चर्चे मध्ये नितिनजी गड़करीं यांनी ” ऍग्रोव्हिजन रेडिओ ” – शेतकऱ्यांना समर्पित . ह्या रेडिओच्यामाध्यमा विषयी सांगितले की या रेडिओमर्फ़त शेती संदर्भात वेग वेगळे प्रयोग , विविध योजनांची माहिती , यशाच्या कथा , ऑरगॅनिक फार्मिंग , इरिगेशन , जैवइंधन आणि शेती तंत्रज्ञान इत्यादी विविधांगी हेतूंना अंगीकारत कृषिकल्याण साधत शेतकऱ्यांना देण्यात येईल।

पत्रकार परिषदेत खासदार श्री रामदासजी तडस , खासदार श्री विकास महात्मे, , माजी कृषीमंत्री महा. शास. श्री अनिलजी बोंडे,आमदार श्री गिरीशजी व्यास, आमदार श्री टेकचंदजी सावरकर , आमदार श्री विकासजी कुंभारे , आमदार श्री आशीषजी जैयस्वाल, मा.आ.प्रा. जोगेंद्रजी कवाडे, श्री गिरीशजी गांधी, श्री रमेशजी मानकर, पत्रकार मित्र व शेतकरी बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *