- Breaking News, नागपुर समाचार, मनपा

नागपूर समाचार : भिवसेनखोरी येथील वंदे मातरम जन स्वास्थ्य केंद्राचे लोकार्पण

जनतेच्या आरोग्यासाठी मनपाचा महत्वपूर्ण पुढाकार : ना. नितीन गडकरी

नागपूर समाचार : प्रत्येक नागरिकाला वेळेवर आरोग्य सुविधा मिळणे अत्यावश्यक आहे. नागपूर शहरातील गोरगरीब जनतेच्या सुविधेसाठी नागपूर महानगरपालिकेने वंदे मातरम जन स्वास्थ्य केंद्र सुरू केले आहे. या केंद्रांमुळे गोरगरीब आणि गरजूंना वेळेवर नाममात्र दरामध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध होणार असून शहरातील जनतेसाठी मनपाने घेतलेला हा महत्वपूर्ण पुढाकार आहे, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या कार्याचे कौतुक केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील गोरगरीब नागरिकांच्या सुविधेसाठी वंदे मातरम् जन स्वास्थ्य केंद्राची सुरूवात करण्यात येत आहे. शहरातील विविध भागात साकारत असलेल्या या केंद्रापैकी भिवसेनखोरी भीमसेना नगर बौद्ध विहार येथील केंद्राचे मंगळवारी (ता.२) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *