- Breaking News, नागपुर समाचार, मनपा

नागपूर समाचार : मनपातर्फे दिव्यांगांना बॅटरी मोटराइज्ड ट्रायसिकलचे वितरणत,

मनपातर्फे दिव्यांगांना बॅटरी मोटराइज्ड ट्रायसिकलचे वितरण

नागपूर समाचार : नागपूर महानगरपालिका समाजविकास विभागाच्या वतीने विविध योजनेअंतर्गत शहरातील ६ दिव्यांग लाभार्थ्यांना मंगळवारी

(ता. २) महापौर दयाशंकर तिवारी व अन्य मान्यवरांच्या हस्ते बॅटरी मोटराइज्ड ट्रायसिकलचे वितरण करण्यात आले. यावेळी १२ पात्र लाभार्थ्यांपैकी उपस्थित ६ लाभार्थ्यांना ट्रायसिकलचे वाटप करण्यात आले. मंगळवारी (ता. २) मनपा आणि समाजविकास विभागातर्फे धनत्रयोदशीचे औचित्य साधून मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात ट्रायसिकल वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, महिला व बालकल्याण समिती सभापती दिव्या धुरडे, नगरसेविका उज्ज्वला शर्मा, मनपा उपायुक्त राजेश भगत, समाजविकास अधिकारी दीनकर उमरेडकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *