- नागपुर समाचार, मनपा

भारतरत्न राजीव गांधी जयंतीनिमित्त मनपातर्फे अभिवादन महापौरांनी दिली सद्‌भावना दिनानिमित्त शपथ

नागपूर, ता. २० : भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न दिवंगत राजीव गांधी यांच्या ७७ व्या जयंतीप्रीत्यर्थ म.न.पा.च्या वतीने डॉ. पंजाबराव देशमुख स्थायी ‍समिती सभागृहात नगरीचे महापौर दयाशंकर तिवारी व अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी भारतरत्न राजीव गांधी यांच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तद्‌नंतर महापौरांनी उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांना सद्भावना दिनाची सामूहिक प्रतिज्ञा दिली.

भारताला एक प्रगत राष्ट्र म्हणून पुढे आणण्यासाठी दूरसंचार तसेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांचे मोठे योगदान असल्याची भावना महापौरांनी यावेळी व्यक्त केली. याप्रसंगी सहायकआयुक्त महेश धामेचा, वाहतूक अभियंता श्रीकांत देशपांडे, निगम अधीक्षक पांडुरंग शिंदे, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस, सहायक अधीक्षक राजकूमार गजभिये आदी उपस्थित होते.

तत्पूर्वी अजनी चौक येथील राजीव गांधी यांच्या पुतळ्यालाही मनपाच्या वतीने जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माजी आमदार एस.क्यू. जमा, माजी आमदार दीनानाथ पडोळे, दिलीप पनकुले, माजी नगरसेवक अशोक काटले, तात्यासाहेब मस्के, भाईजी मोहोड, सचेंद्रसिंह चौहान, मच्छिंद्र आवळे, सूरज बोरकर, विजय मसराम, प्रमोद जोंधळे, संजय शेवाडे, रवींद्रसिंह मुल्ला, संजय दुधे, नदीम जमा उस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *