- नागपुर समाचार, मनपा

नवीन तंत्रज्ञानाचा माध्यमातून पार्किंग सुविधा उपलब्ध करा : महापौर

नागपूर,ता. २० : झपाटयाने विकसित होणारे नागपूर शहरात पार्किंगची समस्या दिवसेंदिवस मोठी होत चालली आहे. पार्किंगच्या समस्येवर नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाययोजना करण्यासाठी महापौर दयाशंकर तिवारी सतत प्रयत्न करीत आहे.

            शुक्रवारी महापौर कक्षात त्यांचे समक्ष दिल्लीचे पार्क प्लस कंपनी तर्फे पार्किंगच्या संदर्भात सादरीकरण करण्यात आले. यावेळी स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, वाहतुक अभियंता श्रीकांत देशपांडे, महामेट्रोचे महेश गुप्ता उपस्थित होते. महापौरांनी कंपनीचे प्रतिनिधी आशीष गौतम यांना १५ दिवसात शहरामध्ये पार्किंगची सद्यस्थितीत आणि त्यावर नाममात्र शुल्कात कश्याप्रमाणे चांगली सुविधा दिली जाऊ शकते. याचा अभ्यास करुन सादरीकरण करण्याची सूचना केली. त्यांनी सांगितले की नागपूर शहरात सद्यस्थितीत १८ लाख वाहने आहेत. यामध्ये १४ लाख दुचाकी वाहन आणि २.३० लाख चार चाकी वाहन आहेत. बाजारपेठेत तसेच रस्त्याच्या बाजूला लागणारे वाहनांची उत्तम पार्किंग सुविधा प्रदान करुन मनपाचा महसूल स्त्रोत कसा वाढता येईल, यावर सुध्दा उपाय -योजना करण्याची सूचना त्यांनी दिली.

            आशीष गौतम यांनी सांगितले की, पार्क प्लस कंपनीचा माध्यमातून पार्किंगची नवीन तंत्रज्ञानावर आधारित पार्किंग सुविधा मेट्रो शहरांमध्ये दिली जात आहे. कॅशलेस, काँटेक्ट लेस व्यवस्थेमध्ये फास्ट टॅग चा माध्यमातून पार्किंग शुल्क घेतले जाते. सगळी व्यवस्था डिजीटल वर आधारित आहे. वाहनचालकांकडून नाममात्र शुल्क घेवून पार्किंगची सोय दिली जाईल. यापासून मनपाला आर्थिक लाभ होईल. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *