
मुंबई, १४ ऑगस्ट २०२१
महिलांना पुरूषी मानसिकतेच्या जोखडातून मुक्त करण्याचे महत्वाचे काम महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केले. देशातील समस्त महिलांना आपल्या अतित्वाची जाणीवच बाबासाहेबांनी करून दिली. या देशात महिलांच्या हक्कांना, कर्तव्यांना त्यामुळे कायदेशीर अधिष्ठान मिळाले आणि खऱ्या अर्थाने सक्षमीकरण होवू शकले. बाबासाहेबांच्या याच विचारांचा वारसा मा.बहन मायावती यांच्या मार्गदर्शनाखाली चालवण्याचे काम बसपा करीत आहे. अशात आजही पुरूषी मानसिकतेने शोषित, पीडित, अपेक्षित महिलांच्या उद्धारासाठी मातृशक्तीने झटले पाहिजे, असे आवाहन बसपाचे प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांनी शनिवारी ‘संवाद यात्रे’दरम्यान आयोजित बसपा महिला कार्यकर्त्या,पदाधिकार्यांच्या मेळाव्यात केले.
‘एखाद्या समाजाची प्रगती मोजायची असेल तर, त्या समाजातील महिलांची प्रगती किती झाली आहे हे मी मोजत असतो’, असे डॉ.बाबासाहेबांनी नागपूर येथे २० जुलै १९४२ रोजी आयोजित ‘ऑल इंडिया डिप्रस्ड क्लासेस वीमेन्स कॉन्फरन्स’मध्ये म्हटले होते. डॉ.बाबासाहेबांच्या याच विचारांनी प्रेरणा घेत जमलेल्या मातृशक्तीने समाजातील इतर भगिनींच्या उद्धारासाठी पुढे येवून सर्वसमावेशक समाज रचनेकरीता हातभार लावण्यासाठी बसपाला बळकट करावे, असे आवाहन अँड. ताजने यांनी केले आहे.
सर्वजनांच्या हिताचे रक्षण करण्याचे काम केवळ ममत्वाच्या भावनेतून मातृशक्तीच करू शकते. सर्वसमावेश विकासासाठी मातृशक्तीला कर्तृत्वाची जोड मिळायला हवी. आजही समाजातील अनेक स्त्रियांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरीत मा.कांशीराम तसेच मा.बहन मायावती यांच्या विचारांनी प्रेरणा घेऊन काम करण्यासाठी महिलांनी पुढाकार घेण्याची गरज आहे, असे अँड.ताजने म्हणले. आगामी महानगर पालिकेच्या निवडणुकीत बसपाकडून महिलांना योग्य प्रमाणत भागीदारी