- नागपुर समाचार

आ.कृष्णा खोपडे, ठवकर परिवारासहित भेटणार पोलीस आयुक्तांना

आ.कृष्णा खोपडे, ठवकर परिवारासहित भेटणार पोलीस आयुक्तांना
घटनेला एक महिना होऊनसुद्धा राज्य सरकारकडून मदत नाही
नागपूर :  पूर्व नागपुरातील पारडी पोलिसांकडून मारहाण झाल्यामुळे पारडी पो.स्टे. मध्ये मनोज ठवकर या दिव्यांग व्यक्तीचा मृत्यू झाला. या प्रकरणी आमदार कृष्णा खोपडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, गृहमंत्री दिलीपजी वळसे पाटील व नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना निवेदन देऊन मृतकाचे परिवाराला आर्थिक मदत व पत्नीला नोकरी देण्याबाबत विनंती केली होती. तसेच केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी व राज्याचे विरोधी पक्षनेते यांनी सुद्धा ठवकर यांचे निवासस्थानी भेट दिली. या घटनेला एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला असून आतापर्यंत कोणताही दिलासा व मदत राज्य सरकारकडून मिळाला नसल्यामुळे पोलीस आयुक्त यांचेकडून यासंदर्भात प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला किंवा नाही, स्थानिक पातळीवर काय कारवाई झाली याचा आढावा घेण्यासाठी दि.09/08/2021 रोजी दुपारी 4.30 वा. आमदार कृष्णा खोपडे ठवकर कुटुंबियांसह पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना भेटणार.

Thanks & Regards
Anil S.Kodape
Mo.9579494851
P.A. to MLA Krishna Khopde

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *