- कोविड-19, नागपुर समाचार

नागपूर समाचार : डेंग्यू वर प्रतिबंधात्मक उपाय कटा, कोरडा दिवस पाळा

नागपूर समाचार : डेंग्यू वर प्रतिबंधात्मक उपाय कटा, कोरडा दिवस पाळा

नागपूर समाचार, ता. ७ :  नागपूर शहरासह विभागातील सहाही जिल्ह्यात डेंग्यू आजार वाढत आहे. प्रशासकीय यंत्रणेतर्फे सुरू असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांना वेग द्यावा आणि नागरिकांनीही त्यांची जबाबदारी ओळखून ‘कोरडा दिवस’ पाळावा, असे आवाहन विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा यानी केले.

डेंग्यू आजाराबाबत प्रशासनासोबतच नागरिकांनीही दक्ष राहण्याचे आवाहन करताना, कोव्हिड -19 च्या विषाणू प्रतिबंधासाठी प्रभावी व परिणामकारक उपाययोजना सुरु असताना नागपूर शहरासह संपूर्ण विभागात डेंग्यू तापाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. डेंग्यू ताप किंवा डेंगी ताप हा एक विषाणूजन्य आजार आहे. इडीस इजिप्ती डासाच्या चावग्यामुळे तो प्रसारित होतो. हा एक तीव्र फ्ल्यूसारखा आजार आहे. हा आजार दोनप्रकारे होऊ शकतो. यामध्ये डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप (डीएचएफ) डेंग्यू तापाच्या रुग्णाला उपचारासाठी विलंब झाल्यास मृत्यू ओढवू शकतो.

त्यामुळे प्रत्येक नागरिकाने खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. डेंग्यू ताप लहान मुलांमध्ये सुद्धा आढळून आला आहे. या तापामध्ये डोके व डोळे दुखणे, अंग दुखणे, अशक्तपणा, अंगावर लाल रंगाच चट्टा तसेच तीव्र स्वरुपाची अंगदुखी ही डेंग्यूची लक्षणे आहेत. या गंभीर स्वरुपाचा आजार डेंग्यू या मादी डासाच्या चावण्याद्वारे पसरतो. या डासांना आळा घालणे या एकमेव उपायामुळे डेंग्यूचा प्रसार थांबवू शकतो. घराच्या आजूबाजूला पाणी साठू न देणे, वेळच्यावेळी साठलेले पाणी रिकामे करणे या गोष्टी डासांना प्रतिबंध करु शकतात.

पावसाचे पाणी घराच्या आवारात अथवा परिसरात कुठेही थांबणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच यासाठी आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस म्हणून पाळावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. घरातील व्यक्तीला ताप आल्यास व लक्षणे आढळल्यास तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे.

महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग हे डेंगीच्या आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करत आहेत. जनतेने जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *