
नागपूर महानगरपालिका क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाणे यांनी पदभार सांभाळल्यानंतर नागपूर शहरातील सहा विधानसभा क्षेत्रातील सहा क्रीडा मैदानांचा विकास करण्याचे उद्दीष्ठ ठरविलेले आहे. त्या अनुषंगाने आज शुक्रवार (ता.१६ जुलै) रोजी पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्र अंतर्गत येणा-या प्रेमनगर मनपा शाळेजवळ विदर्भ हॉऊसिंग बोर्ड कॉलोनी येथील क्रीडा मैदानाची क्रीडा सभापती श्री.प्रमोद तभाने व उपसभापती श्री. लखन येरवार यांनी पाहणी केली. या क्रीडा मैदानास खेळण्यायोग्य आदर्श असे क्रीडा मैदान बनविण्याकरीता मैदान समतोल करणे, कंपाऊंड वॉलची संपूर्ण दुरुस्ती आणि पेंटींग, क्रीडा मैदानाच्या डाव्या बाजूला कंपाऊंड वॉल बनविणे, दोन व्हॉलीबॉल पोल लावणे, चार हायमास्ट लाईट लावणे, कंपाऊंडला नवीन गेट बसविणे इत्यादी कार्य ताबडतोब पूर्ण करण्याबाबतचे क्रीडा सभापती प्रमोद तभाने यांनी संबंधित अधिकारी यांना निर्देश दिले.
या प्रसंगी प्रभाग क्र.२१ चे नगरसेवक तथा मनपा आरोग्य सभापती संजय महाजन, प्रभागातील प्रतिष्ठीत नागरिक राजेश ठाकूर, सागर मोहिते, तुषार ठाकरे, नितीन भिसीकर, परेश डाखोळे, मनोज वांदे, रोशन बुराडे, राजू गौर, सागर बारापात्रे, मनपाचे क्रीडा नियंत्रण अधिकारी नितीन भोळे, क्रीडा अधिकारी पियुष अंबुलकर, क्रीडा सभापती स्वीय सहाय्यक प्रमोद गायकवाड उपस्थित होते.