- नागपुर समाचार

ग्रामीण रुग्णालयात व प्राथमिक आरोग्य केंन्द ला उपचारार्थ १ व्हेंटिलेटर मशीन व २ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन भेट

ग्रामीण रुग्णालयात व प्राथमिक आरोग्य केंन्द ला उपचारार्थ १ व्हेंटिलेटर मशीन व २ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन भेट

पारशिवनी– शहरात व परिसरात कोरोना चा प्रादुर्भाव अतिवेगाने वाढत असल्यावर ही ग्रामीण रुग्णालय पारशिवनी आणि प्राथमिक आरोग्य केंद्र नवेगाव(खैरी) ला व्हेटिंलेटर मशीन व ऑक्सीजन काॅन्सन्ट्रेटर मशीन नसल्याने किती तरी लोकांचा मृत्यु झाला. शहरात कोरोना रुग्णांची वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत व मृत्यु दरांची संख्या अतिवेगाने वाढत असल्यामुळे पारशिवनी शहरातील भाजप नेते व किसान विकास आघाडी नागपुर जिल्हा ग्रामीण माजी महामंत्री अशोक कुंथे, भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे, भाजपा युवा मोर्चा पारशिवनी तालुका अध्यक्ष प्रतीक वैद्य, महामंत्री मनोज गिरी, आशीष भुरसे आदिंनी सतत प्रयत्न करीत केंन्द्रीय मंत्री मा.श्री नितिन गडकरी यांची भेट घेऊन व त्यांना एक निवेदन देऊन पारशिवनी शहर व ग्रामीण करिता व्हेटिंलेटर मशीन व ऑक्सीजन काॅन्सन्ट्रेटर मशीन उपलब्ध करून देण्याची मागणी केली

असता मा. श्री नितिन गडक री यांनी त्वरीत दखल घेत पारशिवनी शहरातील कोरोनाची साकळी तोडण्याकरिता ग्रामिण रूग्णालय पारशिवनी आणि प्राथमिक आरोग्य केंद्र नवेगाव (खैरी ) १ व्हेंटिलेटर मशीन व २ ऑक्सीजन काॅन्सन्ट्रेटर मशीन उपलब्ध करून दिल्याने भाजपा पारशिवनी तालुकाच्या पदाधिका-यांनी पारशिवनी ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र नवेगा व (खैरी) येथे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत वाघ, डॉ तेजराम भलावी, डॉ राजेश पवार, डॉ तारीक अन्सारी, डॉ.गजानन धुर्वे डॉ. रवि शेड़े यांना भेट देऊन सहकार्य केले. या प्रसंगी अशोक कुथे, प्रतीक रमेशराव वैद्य, मनोज गिरी , आशीष भुरसे, रानु शाही, संकेत चकोले, सचिन कांबडे, सौरभ पोटभरे, पवन शास्त्री, सागर ठाकरे आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

केंन्द्रीय मंत्री नितिन गडकरी हयांनी ग्रामिण रूग्णालय पारशिवनी ला उपचापाथ विविध मशीन उपलब्ध करून दिल्याबद्दल भाजपा पारशिवनी तालुकाच्या पदाधिका-यांनी माजी ऊर्जामंत्री व पालक मंत्री मा. श्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाध्यक्ष अरविं दजी गजभिये, जिल्हा महामंत्री अविनाश खळतकर, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आदर्श पटले, जिल्हा महामंत्री राहुल किरपान यांचे विशेष आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *