नागपुर समाचार : खैरे कुणबी समाज पश्चिम नागपुरच्या वतीने १६ नोव्हेंबर रोजी कुसुमताई वानखेड़े हॉल येथे राज्य स्तरीय उपवर- उपवधू परिचय मेळावा व स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन श्री भगवंतरावजी रडके यांनी केले तर अध्यक्षस्थानी डॉ. महेश महाजन, निलेशजी महाजन, डी.के.आरीकर, प्रेमभाऊ झाडे, हिम्मतराव चतुर, प्रदीप वादाफळे, गुणेश्वर आरिकर, धोबे साहेब, डॉ. रमेश ठाकरे मान्यवरानी उपस्थित राहुन मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचा लाभ विदर्भातील सर्व समाजबांधव जवळपास २००० लोकांनी उपस्थित राहुन लाभ घेतला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्य संघटक महादेवजी वैद्य, अध्यक्ष मोहनजी डंभारे, कमलाकर बोरकुटे, राजेश पिंपले, राजेंद्र महाजन, ज्ञानेश्वर शेंडे, राजीव धानोरकर, रामचंद्र भगत, विजय चाफले, सौ. वर्षाताई रोड़े, सौ. कल्पनाताई रडके आणि मयुरी वैद्य यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे संचालन सौ. वीणा शेंडे यांनी केले तर आभार सुनील मगरे यांनी मानले.




