नागपुर समाचार : धरमपेठ येथील विनोबा विचार केंद्र, सर्वोदय आश्रम नागपूर येथे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानी लीलाताई चितळे तर प्रमुख अतिथी पाहुणे मुंबईच्या शारदा साठे, ई झेड खोब्रागडे नागपूर तसेच अरुणा सबाने नागपूर यांची उपस्थिती राहतील. असे महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषद विदर्भ विभागाच्या वतीने पत्रकार परिषदेत शुभदा देशमुख व शारदा साठे यांनी पत्रपरिषदेत माहिती दिली.
स्त्री हक्कांच्या जाणीवेतून समता व शांतता प्रस्थापित करण्यासाठी विदर्भ विभागीय स्त्री मुक्ती परिषदेचे आयोजन मंगळवारी सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे. करिता या कार्यक्रमात विदर्भातील सर्व जिल्ह्यातील महिलांनी व पुरुषांनी सहभागी होण्याचे आवाहन केलेले आहे.
यावेळी मंचावरील उपस्थित शारदा साठे, शुभदा देशमुख, छाया खोब्रागडे, यामिनी चौधरी, सुवर्णा दामले आणि सुजाता भोंगाडे यांची उपस्थिती होती.




