- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : जिल्हाधिकारी कार्यालयात सेवा हक्क दिनाचे आयोजन

नागपूर समाचार : जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात आज सेवा हक्क दिनाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सेवा हक्क दिनाच्या अनुषंगाने शपथ घेतली.

अपर जिल्हाधिकारी प्रवीण महिरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अभय जोशी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी तसेच आपले सरकार सेवा केंद्र व आधार केंद्र चालकांचा सत्कार करण्यात आला.