हिंगणघाट समाचार : महिलांच्या सामाजिक, शैक्षणिक व वैचारिक सशक्तीकरणासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी दिलेले योगदान अनमोल असून त्यांच्या कार्यामुळे महिलांना शिक्षण व समानतेचा हक्क प्राप्त झाला, असे प्रतिपादन आमदार समीर कुणावार यांनी केले.
आमदार समीर कुणावार यांच्या स्थानिक जनसंपर्क कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला नवनियुक्त नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर, नवनियुक्त नगरसेविका तसेच भाजपा महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला आमदार समीर कुणावार व नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर यांच्यासह जिल्हा महिला मोर्चा सरचिटणीस रवीला आखाडे, जिल्हा कार्यकारणी सदस्य अनिता मावळे, भाजपा महिला शहराध्यक्ष शारदा पटेल, महिला तालुकाध्यक्ष कीर्ती सायंकार, कौसर अंजुम , प्रेमीला हीवंज, उमा पानवटकर, वंदना कामडी , पल्लवी कामडी, नगरसेविका प्राची प्रसाद पाचखेडे, नगरसेविका अश्विनी मानेकर, नगरसेविका प्रतिभा पडोळे, कविता सलामे , समुद्रपूर ग्रामीण महिला अध्यक्षा विजया तेलरांधे, नगरसेविका मंगलाताई कुमरे, सुचिता सातपुते, मीना सोनटक्के इत्यादी उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
कार्यक्रमातून सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आदर्श घेऊन महिलांच्या प्रगतीसाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त करीत महिलांनी “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अमर रहे”च्या घोषणा दिल्या.




