नागपूर समाचार : नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मिळालेले घवघवीत यश हे जनतेने भाजपवर दाखवलेल्या दृढ विश्वासाचे आणि विकासाभिमुख धोरणांना दिलेल्या मान्यतेचे स्पष्ट द्योतक आहे, अशी प्रतिक्रिया आमदार संदीप जोशी यांनी व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात व देशात राबविण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी योजना, पारदर्शक प्रशासन आणि मजबूत पायाभूत सुविधा विकासाचा सकारात्मक परिणाम या निवडणूक निकालातून दिसून येतो. तळागाळातील कार्यकर्त्यांनी केलेल्या निष्ठावान आणि सातत्यपूर्ण परिश्रमांचे हे फळ आहे.”
नगर परिषदांमधील विजयी उमेदवारांनी जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करावे, विकास, स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य व नागरी सुविधा या विषयांना प्राधान्य द्यावे, असे आवाहनही आमदार जोशी यांनी केले.
या यशाबद्दल त्यांनी सर्व मतदारांचे, कार्यकर्त्यांचे व पक्षनेतृत्वाचे मनापासून आभार मानले.




