- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : स्वागतनगर न्यू नरसाळारोड येथे जनसेवा मोहिमेचा निःशुल्क शिबिराचा शेकडो नागरिकांनी घेतला लाभ

नागपूर समाचार : प्रभाग 29 मध्ये प्रभाग प्रमुख श्रीकांत खंदाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात वं. बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख यांच्या स्मृतिदिना निमित्ताने जनसेवा मोहीमेला सार्थक फाऊंडेशन तर्फे निशुःल्क नेत्र तपासणी व मोतिया बिंदू आपरेशन, लता मंगेशकर हॉस्पिटल च्यावतीने मोफत आरोग्य तपासणी व रोगनिवारण मार्गदर्शन तसेच निःशुल्क आयुष्यमान कार्ड शिबीर आयोजित करण्यात आले होते त्याप्रस़ंगी प्रमुख पाहुणे नगरसेविका मंगलाताई गवरे, सिद्धु कोमजवार, याच्या शुभहस्ते वं. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले.

त्यावेळी प्रभाग प्रमुख श्रीकांत खंदाडे, सुनील भातकूले, नरसिंह वाघ, विनोद तरडकर, शामराव आगाशे, महादेव कुहिटे, दिनकर राऊत, सुधीर भातकूले, बापुजी काटकर, अनिल आगलावे, रोहन वंजारी, चंद्रपूर मेश्राम मित्र परिवार पंकज राऊत, शुभम बालपांडे, शिवशंकर गुरपुडे, शुभम लखपती, रोहन तरवटकर, शुभम कानतोडे, अभिनव श्रीराव, ललित मांडवगण, अक्षय हरडे, गिताताई बालपांडे माधुरी खंदाडे, पुष्पाताई रणनवरे, निकिता कुहिटे, व ईतर शिवसैनिक महिला आघाडी उपस्थित होते. जनसेवा मोहीमतील प्र. 29 मधील शेकडो महिला पुरुष व मुला मुलींनी शिबिराचा लाभ घेतला.