सुभेदार लेआउट येथील जवाहर नगरात श्रीमद् भागवत कथेचे आयोजन
नागपूर समाचार : श्रीमद्भगवद्गीता अभ्यासक मित्र मंडळ, जवाहरनगर, नागपूर तर्फे मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आळंदी (देवाची) येथील सुप्रसिद्ध भागवताचार्य तसेच सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, आळंदीचे अध्यापक ह.भ.प.श्री. ज्ञानेश्वर माऊली महाराज शिंदे यांच्या अमृततुल्य वाणीतून संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन २४ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या दरम्यान प्लॉट न.१५ जवाहरनगर, गल्ली नंबर ६, जुना सुभेदार ले आऊट नागपूर येथे करण्यात आले आहे. कथेची वेळ सायंकाळी ५ ते ८.३० पर्यंत राहील. तसेच दररोज सकाळी ६.३० ते ७.३० काकडा भजन, सकाळी १० ते १२.३० ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सामुहिक पारायण, दुपारी ४ ते ५ हरिपाठाचे आयोजन तसेच गीता जयंतीच्या निमित्याने विशेष कार्यक्रमा अंतर्गत ह.भ.प.प्रमोद महाराज ठाकरे, ह.भ.प.सुभाष महाराज काळे, ह.भ.प. उल्हास महाराज सूर्यवंशी यांची हरि कीर्तने आयोजित करण्यात आलेली आहेत. श्रीमद् भागवत कथेची सांगता २ डिसेंबर रोजी, सकाळी १० वाजता. गोपाल काल्याचे कीर्तनाने होईल व त्यानंतर भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात येईल.
ह.भ.प. प्रमोद महाराज ठाकरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात तसेच श्रीमद्भभगवगीता अभ्यासक मित्र मंडळाचे संजय बंदेलवार, सुनील देवते, सुधाकर हटवार, रमेश वनकर, सुधीर वानकर, जिवलग कोहळे, ह.भ.प. सुनील महाराज येरखेडे योग प्रशिक्षक नामदेवराव फटिंग, वाल्मिक आंबेकर, श्याम पोहाणे, सुरेश धावडे, श्रीमती निर्जलाताई सोनटक्के, सौ.कल्पना येरमवार, सौ.सुरेखा ढोरे व मंडळाच्या सर्व सदस्यांच्या व साधकांच्या पुढाकाराने तसेच जवाहरनगर येथील समस्त नागरिक यांच्या सहकार्याने मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भव्य दिव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या कार्यक्रमाला केंद्रीयमंत्री नितीनजी गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, आमदार मोहन मते व इतर समाजसेवी व मान्यवर मंडळी उपस्थित राहतील. मंचावरील मंडळींचा सर्व परिचय संदीप कोहळे यांनी करून दिला. पत्रपरिषदेत श्रीमद् भगवद्गीता अभ्यासक मित्र मंडळाचे संजय बंदेलवार यांनी पत्रकांराना माहिती दिली.




