- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : खासदार सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत ‘जागर भक्तीचा’ मध्ये रामरक्षा आणि मारुती स्तोत्र पठण संपन्न 

‘राम रामेती रामेती रमे रामे मनो रमे’; ‘जय श्री राम’ आणि ‘जय हनुमान’ च्या गजराने ने वातावरण भक्तिमय

नागपूर समाचार : ‘जय श्री राम’ आणि ‘जय हनुमान’ च्या गजराने आज मारुती स्रोत पठण आणि १३ वेळा रामरक्षा स्तोत्र पठणाचा कार्यक्रम अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. 

खासदार सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत ‘जागर भक्तीचा’ कार्यक्रमात आज रविवारी ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात रामरक्षा आणि मारुती स्तोत्र पठणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शेकडोच्या संख्येने महिला पुरुष आणि युवक तसेच लहान मुलांनी यात सहभाग दर्शविला. 

सामाजिक कार्यकर्त्या व संस्कार भारतीच्या अध्यक्ष कांचनताई गडकरी, भगवताचार्य स्वामी सूरीथानंदजी महाराज, स्वामी सूर्यानंद महाराज, विश्व हिंदू परिषदेचे नीलकंठ गुप्ता, प्रतिभाताई दटके, चॅरिटी कमिशनर आभा कोल्हे, दिव्या धुरडे, सविता मते, रवी वाघमारे, साहित्यिक रश्मी वाघमारे, खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले आणि डॉ. दीपक खिरवडकर यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची विधिवत सुरवात केली. श्रद्धा पाठक, श्रीरंग वऱ्हाडपांडे, सोमू देशपांडे, स्वप्ना रोडी, सुजाता काथोटे, दर्शना नखाते, स्वप्ना सागुर्डे, पुनीत पोतदार, अभिजित कठाळे, विश्वनाथ कुंभलकर, राखी जामकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. 

तत्पूर्वी, सहजयोग संस्थेतर्फे ध्यान साधना आणि योगाभ्यास करण्यात आला. त्यांनतर कांचनताई गडकरी यांनी नामस्मरण दिंडीचे पूजन आणि स्वागत केले. ही नामस्मरण दिंडी चंदन नगर मधून निघाली आणि क्रीडा चौकात त्याचे स्वागत करण्यात आले. तुळशीची रोपटी घेतलेल्या मुली आणि ‘श्री राम जय राम जय जय राम’ याचा निनाद झाला आणि सर्व वातावरण भक्तिमय झाल्याचे दिसून आले. अत्यंत प्रसन्न वातावरणात रामाची आरती आणि अल्पोपहाराची वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले. 

देश धर्मासाठी सदा तत्पर रहा: भगवताचार्य स्वामी सूरीथानंदजी महाराज

येणाऱ्या पिढ्यांसाठी अत्यंत महत्वाचे असे हे आयोजन आहे असे सांगून देश धर्मासाठी सदा तत्पर रहा असा संदेश भगवताचार्य स्वामी सूरीथानंदजी महाराज यांनी दिला. संस्कारपूर्ण पिढी तयार झाल्यास अशी पिढी देशाच्या विकासात हातभार लावते. या सर्व प्रक्रियेत स्थिर चित्त, मनो विकास साधण्यात आध्यात्मिकतेची भूमिका देखील महत्वपूर्ण असल्याचे ते म्हणाले.