नागपूर समाचार : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नागपूर द्वारा आयोजित जिलास्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धा दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी तालुका क्रीडा संकुल, कोराडी, नागपूर येथे उत्साहात संपन्न झाली.
या प्रतिष्ठित स्पर्धेत नागपूर महानगरपालिका अंतर्गत नेताजी मार्केट हिंदी माध्यमिक शाळेचे एकूण ७ विद्यार्थी सहभागी झाले होते. यापैकी ४ विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळकौशल्याचे प्रदर्शन करून शाळेचा मान उंचावला. विजेत्या खेळाडूंनी एक रौप्य पदक व पाच कांस्य पदक अशी एकूण ६ पदके मिळवली. या उल्लेखनीय यशामुळे खेळाडूंची निवड आता विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी झाली आहे.
विजेत्या खेळाडूंची नावे व यश
मोहम्मद अली – १ रौप्य पदक व १ कांस्य पदक
रोहित कोरी – २ कांस्य पदके
ज्योती साहू – १ कांस्य पदक
अलिशा खान – १ कांस्य पदक
या विजेत्या खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय शाळेचे शिक्षक श्री. प्रतिक सुखदेवे सर यांच्या मार्गदर्शनाला दिले. त्याचबरोबर त्यांनी नागपूर मनपा शिक्षण विभाग, शिक्षणाधिकारी सयाम , क्रीडा अधिकारी डॉ. पियूष आंबुलकर , शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका छाया कौराशे व सर्व शिक्षक वृंद यांचे आभार मानले.




