नागपूर समाचार : आदिवासी हलबा समाज विकास संस्थे तर्फे शैक्षणीक मार्गदर्शन शिबीर रविवारी, 14 सप्टेंबर रोजी संत कबीर हायस्कूल, नाईक तलाव, बांग्लादेश, नागपूर येथे मनोहारराव वाकोडीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. शिबीरांचे उद्घाटन प्रमुख पाहुणे सौ.अर्चना गजभीये, मुख्याध्यापीका, राष्ट्रसेवा विध्यालय, पद्मानगर, तसेच श्रीमती चंद्रकला बारापत्रे, संस्थापक संचालिका, श्री गणपती फाऊंडेशन (एनजीओ), नागपूर, सौ.आरती गोखले, जयप्रकाश हेडाऊ, संत कबीर हायस्कूलचे सचीव यांचे शुभहस्ते करण्यात आले. प्रास्तावीक संस्थेचे सचिव भास्कर चिचघरे यांनी केले. प्रास्तावीका मध्ये संस्थेच्या कार्याची माहिती संविस्तरपणे सचिवांनी दिली.
उद्घाटनाप्रसंगी सौ.अर्चना गजभीये व श्रीमती चंद्रकला बारापत्रे म्हणाल्या की संस्थेद्वारे शैक्षणीक मार्गदर्शन शिबीरांचे आयोजन करून शिक्षणा बद्दलची माहिती समाजाचा गरीब विध्यार्थ्यांना देणे हे फार मोलाचे कार्य ठरले आहे. शिक्षणामुळे समाज प्रगत होऊन देशाच्या प्रगती मध्ये सुध्दा मदत होत असते. संस्थेद्वारे अश्या प्रकारचे कार्यक्रम निःस्वार्थपणे राबवीत असतात. याची मला पूर्ण जाणीव आहे. असे पाहुण्यांनी आपले मत व्यक्त केले. भविष्यात आमच्या क्षमतेनुसार आम्ही गरज भासल्यास संस्थेला मदत करू असे आश्वासन दिले. शैक्षणीक मार्गदर्शन शिबीरांमध्ये वर्ग 8 वी ते 10 वी च्या विध्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे मार्गदर्शन प्रदीप एम.भुसारी यांनी केले व सायन्स विषया संबंधी मार्गदर्शन सौ. माधवी परमानंद श्रीरामे, हिने केले तर गणीत विषयाचे मार्गदर्शन सुरेश पेटकुले यांनी केले. तसेच बाल लैंगीक शोषण, मुलींनी स्वतःची सुरक्षितता व महिला संशक्तीकरण त्याच प्रमाणे समाज प्रबोधनपर मार्गदर्शन पोलीस दीदी (दामिणी पथक) तर्फे सौ. शर्मिष्ठा मैडम व स्वाती मैडम हीने केले.
तिन्ही विषयांसबंधी नवीन प्रकारची माहिती तसेच बाल लैंगीक शोषण, स्वतःची सुरक्षितता बद्दल माहिती आम्हाला मिळाल्याचे विध्यार्थ्यांनी बोलुन दाखविले व म्हणाले की आम्हाला अश्या प्रकारची माहिती समोरही मिळेल अशी आशा व्यक्त केली. कार्यक्रमाला जयप्रकाश हेडाऊ, संत कबीर हायस्कूलचे सचीव यांनी सुध्दा मार्गदर्शन केले व म्हणाले की आमच्या कडुन जी काही संस्थेला मदत लागेल ती आम्ही करण्यास तयार आहोत असे आश्वासन दिले.
प्रकाश दुलेवाले, कविता लेखक व सामाजीक कार्यकर्ते, यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की या शिबीरात आपणास फार महत्वाची माहिती मिळालेली आहे. आपण या संस्थेचे कार्य बघून मी विध्यार्थी म्हणून समाजासाठी काय करू शकतो यावर आपण पुर्ण लक्ष्य केंद्रीत करून सामाजीक कार्यात सक्रीय व्हावे असी सूचना विध्यार्थ्यांना केली.
शैक्षणीक मार्गदर्शन शिबीराचे संचालन संतोष भंडारवार यांनी केले तर आभार सौ. संगीता सोनक हिने मानले. शैक्षणीक मार्गदर्शन शिबीरांमध्ये 80 विध्यार्थी व विध्यार्थीनिंनी भाग घेतले. शिबीर यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.




