नागपूर समाचार : दक्षिण नागपूरातील, ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान नागपूर अंतर्गत पूर्णब्रह्म अभियान उपक्रम राबविला जात आहे. उपाशी कुणीही झोपू नये हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. त्याअंतर्गत प्रतिष्ठानचे सचिव राजू मिश्रा यांचे मार्गदर्शनाखाली अमरनगर ज्येष्ठ नागरिक मंडळ, नागपूर यांचे वतीने या उपक्रमा अंतर्गत प्रतिष्ठानला गहू, तांदूळ, डाळ, इत्यादीच्या माध्यमातून मदत करण्यात आली.
मंडळाचे अध्यक्ष देविदास आगरकर, सचिव वसंतराव इझनकर, डॉ. राजेश कुऱ्हाडे, सुरेश उरकुडे, गणपतराव निंबाळकर, रमेश जिल्हारे यांनी धान्य गोळा करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. या अन्नदानात अमरनगर परिसरातील नागरिक, योगा मंडळ व इतर मंडळे सौ. ढोले यांनी मोलाची मदत केली.




