मोफत भव्य आरोग्य रोगनिदान शिबिराचे आयोजन
नागपूर समाचार : माॅ तुळजा भवानी देवस्थान मनीष नगर नागपूर कडून सार्वजनिक मनोकामना अखंड ज्योत बुकिंग सुरू सोमवार २२ सप्टेंबर २०२५ पासून अश्विन नवरात्र ची सुरुवात होत आहे. सार्वजनिक मनोकामना अखंड ज्योत बुकिंग सुरू झालेली आहे. अधिक माहितीसाठी दिलेल्या मोबाईल नंबर वर ९८५०७३५१०७, ९८८१०४०४७३, ०७१२-२७८९७८६ संपर्क साधावा.
या अश्विन नवरात्रीला माॅ तुळजा भवानी देवस्थान मनीष नगर नागपूर येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सोमवार २२ सप्टेंबर २०२५ सकाळी ६ वाजता आई तुळजा भवानी मातेच्या अभिषेक व नंतर ९ वाजता प्रधान घट स्थापना होईल त्या नंतर सायंकाळी ५ वाजता भक्तांच्या हसते ६५१ सार्वजनिक मनोकामना अखंड ज्योत प्रज्वलित होतील रात्री १० वाजेपर्यंत, स्वतः भक्त परिवार उपस्थित राहून मनोकामना अखंड ज्योत प्रज्वलित करतील.
दररोज सकाळी ९ वाजता आणि संध्याकाळी ८ वाजता आई तुळजा भवानीची सार्वजनिक आरती व नंतर सायंकाळच्या सार्वजनिक आरती ला दर रोज महाप्रसाद वितरण होणार आहे. भक्तांच्या हस्ते प्रति दिवस भजन, कीर्तन, आईच्या गोंधळ लहान मुलांचे कार्यक्रम रास गरबा इत्यादी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
दि.२३,२४,२५,२६,२७,२८,२९,३०, मोफत भव्य आरोग्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे जनरल तपासणी दंत तपासणी नेत्र तपासणी मोफत औषधी वाटप दिव्यांग व दुर्घटनाग्रस्त यांना छडी, वाकर, बाथरुम खुर्ची, कानाचे यंत्र, मशीन दिव्यांग सायकल इत्यादी साहित्य तसेच आघार कार्ड निराधार योजना श्रावणबाळ योजना वयोश्री योजना आयुष्यमान कार्ड ज्येष्ठ नागरिक कार्ड बांधकाम कामगार योजना महिला घरेलू कामगार योजना नवीन वोटिंग कार्ड राशन कार्ड इत्यादी शासकीय योजने चे काउंटर लागणार आहे
विशेष कार्यक्रम दिनांक ३०-९-२०२५ ला सायंकाळी ५ वाजता अष्टमी होम हवन पूजा आणि कन्या भोज कार्यक्रम सार्वजनिक भव्य स्वरूपात होणार आहे. दिनांक २-१०-२०२५ ला सकाळी दुपारी १२ वाजता सोनेगाव तलावावर सर्व घट विसर्जन होतील त्या नंतर दुपारी १२:३० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत महिला भक्तांना नि:शुल्क ओटी वाटप होणार आहे. महिला भक्तांनी वेळेवर येऊन लाभ घ्यावा.
दिनांक ४-१०- २०२५ रोजी देवस्थानाकडून सायंकाळी ५ वाजता पासून भव्य महाप्रसादाचा आयोजन रात्री ११ वाजेपर्यंत करण्यात आलेला आहे. हे कार्यक्रमाच्या स्वरूप माॅ तुळजा भवानी देवस्थान ट्रस्ट कमिटी चे अध्यक्ष प्रवीण लता बालमुकुंद शर्मा आणि सचिव सचिन शर्मा कोषाध्यक्ष ज्योती शर्मा, अल्केश महेंद्र क्षमा जस्वाल राहुल हेडाऊ श्याम सुन्दर खंडेलवाल, अजय नवलकर , देबुलाल पिपलवा संजय गवई रामदेव शर्मा राजेंद्र तिवारी इतर समितीचे सदस्य आणि ते अश्विन नवरात्र उत्सव देवी भक्त परिवार भक्तांनी वेळोवेळी येऊन कार्यक्रमाच्या लाभ घ्यावा.




