पारशिवनी समाचार : दि.16/09/2025 रोजी सायकाळी 9.50 वाजता नवेगाव खैरी येथिल पेच प्रकल्पातील जलाशय पाण्याची पातळी 335.00 मी. 99..06% टक्के झालेली असुन व तोतलाडोह धरणातून पाणी च्या विसर्ग होत असुन परंतु सध्या पेच प्रकल्पाच्या जलाशय पाणलोट क्षेत्रात नैसर्गिक पाऊस पडत असल्यामुळे धरणात पाण्याचा येवा सुरु असुन जलाशयाच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. पाण्याचा येवा पाहता पेच प्रकल्पाच्या मंजुर जलाशय प्रचलन आराखडा (ROS) विसाहर्ता नुसार दि. 16/09/2025 च्या रात्रि प्रयत प्राप्त झालेली रिपोर्ट प्रमाणे सध्या आता पर्यंत जलशयाची पाणी पातळी 85 % ठेवावी लागणार आहे. त्यामुळे धरणाच्या सुरक्षितते च्या दृष्टीने पेच प्रकल्पाच्या धरणातुन वक्रगेट व्दारे(Spillway) वरुन सोडण्यात आलेला विसर्ग धरणात येणा-या ये त्यानुसार रात्रि किंवा मध्यरात्री च्या दरम्यान कोणत्याही क्षणी कमी काही गेट उघळण्या येणार किंवा जास्त केला जाउ शकतो याची नोंद घ्यावी. त्यामुळे नदीपात्रातील पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊन नदीला पुर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
संभाव्य पुराच्या पाण्यामुळे जिवीत व वित्तहानी होऊ नये या दृष्टीने आपल्या अधिनिस्त तालुक्यातील पेच नदी व कन्हान नदीच्या व नाल्याच्या काठावरील दोन्ही बाजुच्या तिरावरील गावातील नागरिकांना आपले गुरे ढोरे, घरगुती व शेती उपयोगी साहित्य सुरक्षित स्थळी ठेवणे व नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याबाबत आपल्या स्थरावरुन सुचना देण्यात याव्या ही विनंती. तसेच कन्हान नदी काठावरील गावांमध्ये वरील प्रमाणे दवंडी व्दारे जाहीर सुचना करण्याबाबत कार्यवाही आपण आपल्या स्थरावर करण्यात आली असून महसुल विभाग व तालुका आपत्ती व्यवस्थापन विभाग व पोलिस पाटील तलाठी यांना सुचित करण्यात आले . नदी काठावर दोन्ही बाजु च्या तिरावरील गावातील नागरिकारनी व शेतकरी यांनी आपले गुरेढोरे घरगुती व शेती साहित्य साहित्य सुरक्षीत ठिकाणी ठेवावे असे आव्हान कार्यकारी अभियंता पेच पाटबंधारे विभाग नागपुर व पारशिवनी शाखा अभियंता यांनी केले आहे.




