- Breaking News, विदर्भ

चंद्रपूर समाचार : खोट्या कागदपत्राचे आधारे कर्ज प्रकरण करणाऱ्या आंनद नागरी बैंकेच्या अध्यक्षाची आरबीआय कडे तक्रार

नागपूर येथील 40 लाखांच्या कर्ज प्रकरणात दीड कोटीची मालमत्ता जप्त करून कुटुंब रस्त्यावर?

चंद्रपूर समाचार : चंद्रपूर मुख्यालय असणाऱ्या आंनद नागरी सहकारी बैंकेची नागपूर येथे जी शाखा आहे तिथून दीड कोटीच्या मालमत्तेवर खोट्या दास्तावेजाच्या आधारे 40 लाखांच कर्ज प्रकरणी मालमत्ता धारक ज्योती मुदलियार यांनी स्थानिक प्रेस क्लब तेथे पत्रकार परिषद घेऊन बैंकेच्या अध्यक्ष, सिइओ व त्यांना साथ देणाऱ्या रुपाली मोरे यांच्यावर मनी लॉंड्रीन्ग ऍक्ट द्वारे गुन्हे दाखल करून मला न्याय देण्यात यावा अशी मागणी केली आहे, यावेळी मनसे उपजिल्हा अध्यक्ष राजू कुकडे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलावार, जनहीत जिल्हाध्यक्ष रमेश काळबांधे, सुनील गुढे, पियुष धुपे व मनसे पदाधिकाऱ्यांची उपास्थिती होती.

दिपक मुदलियार यांची नागपूर अभ्यंकर नगर येथील प्लाट क्रमांक 252, घरं क्रमांक 311/A/249 दोन मजली इमारत होती, या इमारतीचा किराया केवळ 15 हजार येत होता आणि दीपक मुदलियार हा काहीही धंदा करतं नव्हता, त्यांना पैशाची गरज होती, मात्र त्यांना कर्ज मिळू शकतं नव्हते, दरम्यान त्या इमारतीला गहाण ठेऊन कर्ज उचल करण्यासाठी दिपक ने योगेश खंडवानी या दलालाला आर्थिक अडचण सांगितली, या दरम्यान रुपाली विनोद मोरे हिला योगेश खंडवानी नावाच्या दलालानी दीपक मुदलियार यांना लोन मिळतं नसल्याने तिचे दास्तावेज जोडले व 20 लाख रुपये बोली लावून श्री आनंद नागरी सहकारी बैंक शाखा नागपूर सोनेगाव इथून 40 लाख रुपयाचे कर्ज प्रकरण तयार केले, या कर्ज प्रकरणात दीपक मुदलियार यांच्या प्लाट क्रमांक 252, घरं क्रमांक 311/A/249 दोन मजली इमारत चे दस्तावेज गहाण ठेवण्यात आले आणि रुपाली मोरे यांचे श्री आनंद नागरी बैंक शाखा सोनेगाव इथे दीपक मुदलियार यांचे सोबत जाईन्ट अकॉउंट तयार करण्यात आले, या जाईन्ट अकॉउंट मध्ये श्री आंनद नागरी सहकारी बैंक तर्फे लोन अमाऊंट 40 लाख रुपये जमा करण्यात आले, मात्र ते सर्व पैसे 40 लाख रुपये रुपाली विनोद मोरे यांनी स्वतःच्या धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी बैंक अकॉउंट मध्ये जमा केले आणि दीपक मुदलियार यांचे धनलक्ष्मी बैंकेत अकाउंट काढून तिथे 15 लाख खात्यात जमा केले.

दिपक मुदलियार यांची मालमत्ता प्लाट क्रमांक 252, घरं क्रमांक 311/A/249 दोन मजली इमारत हिचे मूल्यांकन हे जवळपास 1.5 कोटी रुपयाची असतांना श्री आनंद नागरी सहकारी बैंकेचे अध्यक्ष दीपक पारेख व सिइओ बनकर यांनी ऑक्टोबर 2017 ला दिलेले लोन हे 40 लाखांचे होते ते सन 2023 मध्ये 75 लाख झाले असल्याचे बैंकेने म्हटले व सदर मालमत्ता हिची किंमत 1.15 कोटी लावली आणि त्यातून 35 लाख रुपये कर्जदाराला येऊन दीड कोटीची मालमत्ता हडपली असल्याचा आरोप ज्योती मुदलियार यांनी लावून मला न्याय न मिळाल्यास बैंकेच्या चंद्रपूर मुख्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

आनंद नागरी अध्यक्ष व इतरांवर नागपूर तेथे गुन्हे दाखल?

दिपक मुदलियार प्रकरणात ज्या पद्धतीने 1.50 कोटीची असताना तीचे मूल्यांकन 1.15 कोटी कसे लावण्यात आले, या मालमत्तेत रुपाली विनोद मोरे हिचा काहीही संबंध नसताना व अधिकार नसताना तिचे दास्तावेज जोडून दीपक मुदलियार यांच्या मालमत्तेवर 40 लाखांचे बेकायदेशीर कर्ज मंजूर झाले कसे हा प्रश्न आहे, बैंकेने बोगस दस्तावेज तयार करून जें कर्ज प्रकरण तयार केले त्यात साक्षीदार विनोद मोरे आहेत जें कर्ज प्रकरणात असलेल्या रुपाली विनोद मोरे हिचे पती आहे, या सर्व स्थितीवरून श्री आंनद नागरी सहकारी बैंक चे संचालक हे बोगस कर्ज प्रकरण करून जनतेची मालमत्ता लुटत आहे हे सिद्ध होते, सोबतच जमीन तारण प्रकरणी श्री आंनद नागरी सहकारी बैंकेच्या अध्यक्ष सिइओ व एजंट वर नागपूर च्या पोलीस स्टेशनं मध्ये 76.65 लाखांची अफरातफर केल्या प्रकरणी गुन्हे दाखल आहे, त्यामुळे श्री आंनद नागरी सहकारी बैंक ही भारतीय रिजर्व बैंकेने आखून दिलेल्या अटी शर्ती आणि निर्देशाचे पालन करतं नसल्याने व जनतेच्या हिताचे रक्षण करतं नसल्याने मनी लॉंड्रीन्ग एक्ट अंतर्गत गुन्ह्यास पात्र आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *