नागपूर समाचार : भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्हा (ग्रामीण) तर्फे भारताचे आदरणीय पंतप्रधान, राष्ट्रनेता मा. श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर (महात्मा गांधी जयंती) या कालावधीत सेवा पंधरवाडा अभियान आयोजित करण्यात आले आहे.
या अभियानांतर्गत भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्हा ग्रामीण (रामटेक) तर्फे आयोजित करण्यात आलेली सेवा पंधरवाडा जिल्हा कार्यशाळा आणि आढावा बैठक यशस्वीपणे संपन्न झाली.
या बैठकित मा.महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष धर्मपालजी मेश्राम, भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. राजीवजी पोतदार, पदवीधर नोंदणी प्रमुख नागपूर विभाग सुधाकरजी कोहळे , माजी जिल्हाध्यक्ष अरविंदजी गजभीये व भाजपा जिल्हाध्यक्ष श्री आनंदजी राउत यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शन आणि कार्यशाळा घेण्यात आली.
तसेच या प्रसंगी जिल्हा महामंत्री अनिलजी निधान, रिंकेशजी चवरे, राहुलजी किरपान, उपाध्यक्ष गज्जू यादव, डॉ. मुकेश मुदगल, संजयजी मुलमुले, विजयालक्ष्मीताई भदोरिया, सुनंदाताई दिवटे, मंगलताई कारेमोरे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष चेतन खडसे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा प्रीतिताई मानमोडे, अनुसूचित जाति मोर्चा अध्यक्ष सतीश डोंगरे, ओबीसी मोर्चा अध्यक्ष सुनील जुवार, किसान आघाडी मोर्चा अध्यक्ष राजेश ठाकरे, अल्पसंख्यक आघाडी अध्यक्ष मोसिन पटेल, माजी महिला आघाडी अध्यक्षा अनुराधाताई अमीन, अजयजी बोढारे, आशुतोष अवस्थी यांची उपस्थिती होती.
तसेच नागपूर जिल्ह्यातील जिल्हा पदाधिकारी सर्व मंडल अध्यक्ष, महामंत्री व संयोजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.