नागपूर समाचार : एडुसन फाउंडेशनचे संस्थापक निलेश काळे यांच्या नेतृत्वाखाली बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. संस्कार हेच खरे शिक्षण या विषयावर शिबिर आयोजित केले आहे. प्लॉट नं. 542 नवीन सुभेदार ले आउट ठवरे कॉलनी रोड नागपूर येथे हा कार्यक्रम 14 सप्टेंबर रोजी 10:30 ते 12:30 च्या दरम्यान आयोजित केला असून यामध्ये वयोगट 6 ते 12 वर्ष बालसंस्काराचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून देवरावजी प्रधान यांची प्रमुख उपस्थिती राहतील.
विशेष वैशिष्ठ म्हणजे नैतिक मूल्यांची शिक्षण व्यक्तिमहत्व विकास, खेळ, योग व कथाकथन कला व हस्तकला आणि बौद्धिक व सांस्कृतिक उपक्रम यावेळी सादर करतील. ही माहिती एडुशन फाउंडेशनचे संस्थापक निलेश काळे यांनी दिली आहे.