- Breaking News, नागपुर समाचार, मनपा

नागपूर समाचार : भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये लवकरच भूमी ग्रीन कंपनीद्वारे पाचशे टन कचऱ्यावर प्रक्रिया

मनपा आयुकांनी केली भांडेवाडी डम्पिंग यार्ड परिसराची पाहणी

नागपूर समाचार : नागपूर महानगरपालिकेद्वारा भांडेवाडी डम्पिंग यार्ड परिसरातील दहा एकर जागेवर भूमी ग्रीन प्रा.लि. कंपनीद्वारे नवीन घनकचरा कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्यात येत आहे. या केंद्रासाठी देण्यात आलेल्या जागेची मनपा आयुक्त कथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी शनिवारी(ता.१३) पाहणी केली.

या प्रकल्पाद्वारे दररोज ५०० हून अधिक मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. शहरात दररोज १३०० मेट्रिक टन कचरा निर्माण होत आहे. यापैकी सध्या सुसबिडीच्या मध्यातून ८०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात असून, भूमी ग्रीन प्रा.लि. कंपनीद्वारे ५०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. परिणामी भांडेवाडी परिसरात दिसणारे कचऱ्याचे ढिगारे कमी होऊन जागा मोकळी होण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे, भूमी ग्रीन प्रा.लि. कंपनीला येत्या पाच वर्षांत करारबद्ध करण्यात आले असून, याद्वारे प्रक्रिया केल्या जाणाऱ्या कचऱ्यातून सेंद्रिय खत निर्मिती व आरडीएफ तयार केले जाणार आहे.

पाहणी दरम्यान मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वसूमना पंत,सहाय्यक आयुक्त विकास रायबोले, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ.गजेंद्र महल्ले, कार्यकारी अभियंता राजेश दुफारे, कार्यकारी अभियंता नरेश सिंघमझोडे, सल्लागार जगताप यांच्यासह सस्टेनेबल बिझनेस डेव्हलपमेंट (SusBDe) कंपनीच्या प्रकल्पाचे प्रतिनिधी, भूमी ग्रीन प्रा.लि. कंपनीचे प्रतिनिधी, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे रोहिदास राठोड, उपद्रप शोध पथकाचे जवान यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पुणे येथील भूमी ग्रीन प्रा.लि. कंपनीच्या माध्यमातून डम्पिंग यार्ड परिसरातील पाचशे टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. येत्या डिसेंबर महिन्यापासून प्रक्रिया केंद्रात पूर्ण क्षमतेने कार्य सुरू केली जाणार आहे. त्यामुळे सुसबिडी आणि भूमी ग्रीन प्रा.लि. द्वारे जवळपास तेराशे टन कचऱ्यावर दररोज प्रक्रिया केली जाणार आहे.

आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सर्वप्रथम एकीकृत शहरी घनकचरा प्रकल्प (सुसबिडी ) येथील प्रकल्पाला भेट देत माहिती जाणून घेतली. विशेष म्हणजे, या ठिकाणी दररोज ८०० टन कचरा संकलित केला जातो. त्यांनी प्रकल्पातील कचऱ्याचे ढिगारे लवकरात लवकर कमी करून, कचऱ्यावर करण्यात येणाऱ्या प्रक्रियेची गती वाढविण्याचे निर्देश दिले.

आयुक्तांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण

भांडेवाडी डम्पिंग यार्ड परिसरातील जागेवर मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी व अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *