- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : TET परिक्षेबाबत सर्वोच्च निकालाच्या विश्लेषणावर चर्चासत्र संपन्न

नागपुर समाचार : मा. सर्वोच्च न्यायालयाने 1 सप्टेंबर 2025 ला, कार्यरत शिक्षकांना TET परिक्षा पास करणे बंधनकारक करण्यात आल्याच्या निर्णयावर महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक महासंघाच्या वतीने आज विजुक्ता प्रांतिय महासचिव डॉ. अशोक गव्हाणकर यांचे अध्यक्षतेखाली महिला महाविद्यालय नंदनवन, नागपूर येथे चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते.

या चर्चासत्रात संघटनेचे मार्गदर्शक पुरुषोत्तम पंचभाई यांनी बालकाच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम कायद्यातील केंद्र व राज्य शासनाच्या तरतुदी, TET परिक्षेबाबत सर्वोच्च न्यायालाच्य निकालातील प्रमुख बाबींवर उपस्थितांना अवगत केले. ज्या शिक्षकांच्या सेवा पाच वर्षापेक्षा जास्त आहे अश्या शिक्षकांच्या नोकरीवर सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाने संकट निर्माण झाले असून मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाक राज्य शासनाची भुमीका जोपर्यंत स्पष्ट होत नाही तो पर्यंत शिक्षकांनी घाबरून न जाता संयम् ठेवण्याचे आवाहन संघटनेचे राज्य सचिव बाळा आगलावे यांनी केले.

RTE लागू होण्यापुर्वीच्याच सेवाशर्ती महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी कायम असल्यामुळे कार्यरत शिक्षकांना TET परिक्षा लागू करता येणार नाही ही बाबत पुनर्विचार याचिकेद्वारे सर्वोच्च्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देने आवश्यक असल्याची भुमीका डॉ. अशोक गव्हाणकर यांन अध्यक्षीय भाषणातून मांडली.

या चर्चासत्राचे सुत्रसंचलन संघटनेचे जिल्हा सचिव प्रविण रेवतकर यांनी केले. य चर्चासत्रात संघटनेचे अध्यक्ष सुनिल चौधरी, भोजलाल वरठी, आनंद महल्ले, संजय लांजेवार जयघोष वाल्देकर, प्रकाश वाकडे, उल्हास पुरकाम, अनिल हिंगणकर, जगन्नाथ सावरकर जयप्रकाश तवले, नरेन्द्र टाकळखेडे, प्रविण राऊत, बंडू भैसारे, अनिल ठकरे, सोमकुवर, शेख सर, प्रदिप कैथे व इतर शिक्षक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *